Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यानरहरी झिरवाळ यांच्याकडून शिंदेगटाला 'जोर का झटका'; गटनेता आणि प्रतोदपदाबाबत घेतला हा...

नरहरी झिरवाळ यांच्याकडून शिंदेगटाला ‘जोर का झटका’; गटनेता आणि प्रतोदपदाबाबत घेतला हा निर्णय

नाशिक | प्रतिनिधी Nashik

एकीकडे राज्यातील संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असतानाच आता शिंदे गटाला मोठा झटका विधानसभा उपाध्यक्षांनी दिला आहे. कालच ‘देशदूत’ने नाशिक जिल्ह्याची भूमिका सध्याच्या राजकीय घडामोडीमध्ये कशी आणि कित महत्वाची आहे याबाबत उल्लेख केला होता….

- Advertisement -

अगदी तशाच्या पद्धतीने विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांनी शिंदे गटाला झटका देत. शिवसेना विधीमंडळ गटनेतेपदावर अजय चौधरी तर प्रतोद पदावर सुनिल प्रभु (sunil prabhu) यांच्या अधिकृत नियुक्तीला मान्यता दिली आहे. कॉंग्रेसचे नाना पटोले (Congress Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद अद्याप रिक्त आहे.

त्यांच्या जागी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहेत. दुसरीकडे, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे (Shrihari Ane) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, गटनेतेपदाचा विषय हा सेनेचा अंतर्गत मुद्दा असून तो त्यांनी चर्चेतून सोडवला पाहिजे. विधानसभा अध्यक्ष कारवाई करू शकत नाहीत. शिवसेना (Shivsena) कुणाची आहे हे जनता ठरवणार असल्याचेही अणे यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या