नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी
मुख्य बातम्या

मोदींचे भाषण : करोना लसीपासून चीनपर्यंत

नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा

jitendra zavar

jitendra zavar

नवी दिल्ली

देशाच्या सार्वभौमत्वावर ज्यांनी डोळे वटारले त्यांना देशाच्या जवानांनी त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे. सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी आपले जवान काय करू शकतात हे लडाखमध्ये दाखवून दिले आहे. एलओसीपासून एलएसीपर्यंत देशाच्या सार्वभौमत्वावर ज्या कुणी वाकड्या नजरेने पाहिले देशाच्या सेनेने त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्यूत्तर दिले. देशाचे सार्वभौमत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या संकल्पानेसाठी देश काय करू शकतो हे लडाखमध्ये जगाला पाहायला मिळाले, असा ईशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांनी लाल किल्ल्यावरुन चीनला दिला. सुमारे 90 मिनिटे लाल किल्यावरुन Red Fort केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी करोना लसीच्या Covid vaccines निर्मितीपासून चीनपर्यंत सर्वच मुद्यांचा परामर्श घेतला.

आज आपले शेजारी देश केवळ ते नाहीत ज्यांच्या भौगोलिक सीमा एकमेकांना मिळतात. अनेक देशांशी आपले ह्दय जुळले आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्रच्या अस्थाई सदस्यासाठी 194 पैकी 184 देशांनी आपल्याला पाठिंवा दिला.भारतीय सार्वभौमतासाठी काय करु शकतात, हे जगाने लडाखमध्ये पाहिली. LOC पासून LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमतेवरुन कोणीही डोळे वटारले तर देशाच्या सैन्याने त्याचा त्याच भाषेत उत्तर दिले आहे.

तीन करोना लसी अंतीम टप्यात

करोना लस कधी तयार होणार? असा प्रश्न विचारला जात आहे. आपल्या देशाचे वैज्ञानिक यासाठी सातत्याने मेहनत घेत आहे. देशामध्ये 3 लसी विविध टप्प्यामध्ये आहेत. शास्त्रांकडून मंजुरी मिळताच त्या येतील. करोनाची लस लवकरात लवकर भारतीयांपर्यंत पोहोचेल याची सर्व तयारी झाली आहे. प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्यासाठी रुपरेखा तयार आहे.

राम जन्मभूमीच्या विषय शांततेत सुटला

राम जन्मभूमीच्या शतकांहून जुन्या विषयाचे आता शांतिपूर्ण समाधान झाले. देशातील लोकांनी ज्या संयमाने आणि समजूतदारपणे आचरण केले ते अभूतपूर्व आहे. ही शांति, एकता आणि सद्भावना भारताच्या उज्ज्वल भविष्याची गॅरंटी आहे.

'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची घोष‌णा

मोदी यांनी 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन'ची घोषणा केली. ते म्हणाले, 'नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन' भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घेऊन येईल. तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरांनी आपल्याला कोणते औषध दिले, केव्हा दिले याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये असतील. त्यासाठी प्रत्येकाला एक आरोग्य आ़यडी दिले जाईल. संबंधित नागरिकाच्या स्वास्थ्याबाबत त्यात माहिती असेल. यामुळे त्याला उपचार घेणे सोपे होईल.या अभिनयानाअंतर्गत उपचारामध्ये येणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा सुविचारीत पद्धतीने विचार करण्यात येणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com