Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशYUVA Scheme: केंद्राच्या या योजनेतून महिन्याला मिळणार ५० हजार

YUVA Scheme: केंद्राच्या या योजनेतून महिन्याला मिळणार ५० हजार

नवी दिल्ली

अनेकांना लिखाणाची आवड असते. काही जण लेखक बनू इच्छिता. परंतु त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. आता केंद्र शासनाने यासाठी एक योजना तयार केली. त्यामाध्यमातून महिन्याला ५० हजार रुपये मिळवता येतील. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट केले आहे.

- Advertisement -

जर तुम्हाला लिखाण पसंत आहे आणि तुम्ही लेखक बनू इच्छिता तर तुमच्यासाठी चांगली संधी प्राप्त झाली आहे.https://innovateindia.mygov.in/yuva/ केंद्र सरकारने केंद्र सरकारने YUVA Scheme ही योजना सुरु केली आहे. या योजनेत लेखणाची आवड असणाऱ्या हुशार युवकांची निवड केली जाणार आहे. त्यांना महिन्याला ५० हजार रुपये आर्थिक मदत मिळणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने या स्कीमचं लॉन्चिंग केले आहे. या माध्यमातून नवोदित लेखकांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या योजनेसंदर्भात ‘मायजीओवीहिंदी’ या टि्वटर अंकाऊटवरुन टि्वट केले आहे. त्यात म्हटले आहे की, “क्या आप एक लोकप्रिय लेखक बनना चाहते हैं? नवोदित लेखकों को परामर्श व प्रशिक्षण हेतु प्रधानमंत्री की YUVA योजना से जुड़ें. 75 चयनित लेखकों को 50,000 रुपये /माह की छात्रवृत्ति मिलेगी.”

नाशिक मनपासाठी शिवसेनेची स्वबळाची तयारी?

काय आहे योजना?

योजनेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींचे वाय ३० पेक्षा कमी वय असायला हवे. १ जून ते ३१ जुलै २०२१ पर्यंत www.mygov.in या माध्यमातून होणाऱ्या अखिल भारतीय स्पर्धेत ७५ लेखकांची निवड केली जाईल. यात अर्ज भरण्यासाठीही एक अट ठेवण्यात आली आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना पुस्तक लिखाणाची माहिती असणे गरजेचे आहे. उमेदवारांना ५ हजार शब्दांची एक स्क्रिप्ट लिहून जमा करावी लागेल. त्यानंतर १५ ऑगस्ट २०२१ रोजी या स्पर्धेतील विजेत्यांची नावे जाहीर केली जातील.

७५ जणांना मिळणार ५० हजार

या स्पर्धेतील ७५ विजेत्यांना पुढील सहा महिन्यांसाठी महिन्याला ५० हजार शिष्यवृत्ती दिली जाईल. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन पुढच्या वर्षी युवक दिनानिमित्त यांच्याकडून पुस्तक लिखाण करून ते प्रसिद्ध केले जाईल. या योजनेतंर्गत पहिल्यांदा एका स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल त्यानंतर यातील ७५ लेखकांची निवड होईल. युवा लेखकांना प्रसिद्ध लेखक प्रशिक्षण देतील. मेंटरशिंप दरम्यान १५ डिसेंबर २०२१ पर्यंत सर्व मॅन्यूस्क्रिप्ट्स तयार करून घेतल्या जातील त्यानंतर पब्लिश केलं जाईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या