Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाला आधीच नारायण राणेंचे मोठे विधान; म्हणाले...

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाला आधीच नारायण राणेंचे मोठे विधान; म्हणाले…

मुंबई | Mumbai

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी (MLA) शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी केल्यापासून महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा वाद सुरू आहे. हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात गेला असून १४ फेब्रुवारी रोजी सत्तासंघर्षावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे (Maharashtra) लक्ष लागले आहे. अशातच आता सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित असतांना भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठे विधान केले आहे.

- Advertisement -

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी ते म्हणाले की, ‘मी ज्योतिष सांगू का? कारण न्यायालयातील प्रकरणांवर मी कधी बोलत नाही. पण उद्धव ठाकरे ज्या चिन्हासाठी भांडत आहेत. ते चिन्ह जाईल. ते चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल. ही टाका ब्रेकिंग न्यूज’ असे त्यांनी म्हटले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच नारायण राणेंनी असे सूचक विधान केल्यामुळे राजकीय (Political) वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

मुंबईत बर्निंग बसचा थरार

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावरून विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देतांना नारायण राणे म्हणाले की, आम्ही विकास केला आहे, मुलं जन्माला घातली नाव देण्याचा अधिकार कोणाला? वडिलांनाच ना? आमच्या विविध योजना महाराष्ट्रात आहेत. काल दोन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) सुरू करण्यात आल्या. पंतप्रधानांना बोलावलं, पैसे ते देतात. त्यात चुकीचं काय? अडीच वर्षांत शिवेसेनेने काय केलं? हे त्यांनी सांगावं. मातोश्री सोडून मंत्रालयात अडीच वर्षांत अडीच तास बसले. हे काय मुख्यमंत्री आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.

…तर निवडणुकीत तिकीट मिळणार नाही; फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

- Advertisment -

ताज्या बातम्या