पाच वर्षात बेपत्ता झालेल्या 1207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश

पाच वर्षात बेपत्ता झालेल्या 1207 महिला व 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हयातून गेल्या पाच वर्षात बेपत्ता (missing) झालेल्या 1 हजार 207 महिला (women) व 263 अल्पवयीन मुलींना (minor girls) शोधण्यात(tracing) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला (Nandurbar District Police Force) यश (succeeded) आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत एकुण 1 हजार 278 महिला बेपत्ता व 274 अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन पळवून नेल्याचे गुन्हे दाखल होते. त्यापैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व अपहरणाच्या गुन्ह्यातील पिडीत मुली अद्यापही मिळून आलेल्या नाही.

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये दि.1 जून 2021 पासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथे मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाच्या मार्फतीने पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेवुन ते मिळून येण्याकरीता प्रयत्न केले जातात.

त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यामधील 1 पोलीस अधिकारी व 2 पोलीस अंमलदार असे एकुण 12 पोलीस अधिकारी व 24 पोलीस अंमलदारांचे पथक पोलीस ठाणे स्तरावर तयार करण्यात आले होते. स्थापन करण्यात आलेल्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रासह, गुजरात व मध्य प्रदेश राज्यात जावून बेपत्ता झालेल्या 1278 महिलांपैकी 1207 व 274 अल्पवयीन मुलींपैकी 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.

अपहरणाच्या गुन्ह्यांतील शोध न लागलेल्या मुलींचा शोध घेण्याकरीता पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्ष स्थापन करण्यात आला असून सदर कक्षाकडून अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात येत असतो. मागील दोन वर्षात सन 2017 पासून शोध न लागलेल्या 14 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश आले आहे.

अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात तपासादरम्यान असे निदर्शनास आले आहे की, यातील 13 ते 18 वर्षे वयोगटाच्या बर्‍याच अल्पवयीन मुलींना फूस लावून ओळखीच्या व्यक्तीबरोबर घरातून निघून गेल्याचे समजून आले आहे. सदर मुलींचे देह व्यापार, शरीर विक्री, अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी होवू नये यासाठी अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्षाकडून सदर मुलींचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांचा ताब्यात देण्यात येत असते.

नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण व बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सदर अल्पवयीन मुलींचे व महिलांचे तस्करी होवू नये व त्या लवकरात लवकर त्यांचा शोध लागावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विशेष ­anti Human Traffiking Unit ची स्थापना करण्यात आली आहे. बेपत्ता महिला व अल्पवयीन मुली यांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस नेहमी प्रथम प्राधान्य देवून काम करीत आहे. गुन्हे तपासाबरोबरच अल्पवयीन मुली, महिला यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करण्याबाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com