नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला निधी मिळ्णार

पर्यटनवाढीसाठी होणार विविध कामे
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याला निधी मिळ्णार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणार्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात ( Nandur Madhyameshwar Bird Sanctuary )पर्यट्कांना आकर्षित करण्यासाठी विविध कामे केले जाणार आहे.

यासाठी महाराष्ट्र निसर्ग पर्यट्न मंड्ळकडून सुमारे 15 कोटीचा निधी ( funds ) मिळ्णार असून पर्यट्कासाठी नांदूरमध्यमेश्वर पुढील दिवसात नंद्नवन ठरणार आहे. महाराष्ट्र निसर्ग पर्यट्न मंड्ळाकडून राज्यभरातील पन्नास स्थळांचा सर्व्हे करण्यात आला.होता. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयाराण्य व ठाणे जिल्ह्यातील तानसा अभयारण्यांची निवड करण्यात आलीे.

पुढच्या काही काळात येथे पक्षी निरीक्षणासाठी मनोरे, पायवाट, ऑफिसेस, बेंचेस, पार्किंग व्यवस्था, स्थानिकांना रोजगार व प्रशिक्षण, पर्यटनासंदर्भातील माहिती, दिशादर्शक फलक, निसर्ग पर्यटन आदीसह पर्यटनासाठी हातभार लावणार्या गोष्टी केल्या जाणार आहेत. नांदूरमध्यमेश्वर टुरिझम अपग्रेड केले जाणार आहे. पर्यटनाच्या मांजरगाव, कातरगाव, कोठुरे या नव्याने साईट वाढवल्या जाणार आहेत, लवकरच या कामांसाठीचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.

दरम्यान गेल्या तीन-चार वर्षापासून नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यामध्ये पर्यट्कांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केले जात असून यात वन्यजीव विभागाला यश आल्याचे चित्र आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये पर्यट्कांच्या माध्यमातून महसुलात वाढ होऊ लागली आहे. मागे भरवण्यात आलेल्या बर्ड फेस्टिव्हलचा फायदा झाला.

ऑक्टोबरपासून विदेशातील विविध दुर्मिळ पक्ष्यांची मांदियाळी येथे दिसून येते. फेब्रुवारी मार्चपर्यत या पाहुण्यांचा मुक्काम नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात असल्याने पक्षीप्रेमी व पर्यावणप्रेमीसाठी हे चित्र पाहण्याची उत्सुकता दिसून येते.

रामसरचा दर्जा मिळाल्यानंतर नांदूरमध्यमेश्वरचे महत्व कमालीचे वाढ्ले आहे. येथील जैवविविधता टिकवण्यासाठी वन्यजीव विभागाला सतत काम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने याकडे वन्यजीव विभागाचे अगदी बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष असते. पुढच्या काही कालावधीत येथे पर्यटकांसाठी सर्व सुविधा मिळ्णार आहे. त्याचा फायदा वन्यजीव विभागासह स्थानिक नागरिकांना होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com