Nandigram Assembly Constituency : हॉटसिट 'नंदीग्राम'मध्ये कोण आहे आघाडीवर?

Nandigram Assembly Constituency : हॉटसिट 'नंदीग्राम'मध्ये कोण आहे आघाडीवर?

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगाल निवडणुकांचा निकालाच्या मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांत झालेल्या मतदानामुळे इतर राज्यांपेक्षा या राज्यात निकाल जाहीर होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या एकूण २९४ जागांपैंकी २९२ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालची सत्ता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हातात राहणार की भाजप मुसंडी मारून परिवर्तन घडवणार? याकडे संपूर्ण देशाचं लागलेलं आहे.

Title Name
Live Blog : पाच राज्यांच्या निवडणुकीचा निकाल; पाहा इथे
Nandigram Assembly Constituency : हॉटसिट 'नंदीग्राम'मध्ये कोण आहे आघाडीवर?

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लढत देत असलेल्या नंदीग्राममध्येही मतमोजणी सुरु असून येथे फक्त राज्य नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष आहे. ममता बॅनर्जींविरोधात भाजपाचे सुवेंदू अधिकारी नंदीग्राममधून निवडणूक लढत आहेत. सुरवातीच्या कलांमध्ये ममता बॅनर्जी आघाडी वर आहेत.

बंगालमधील सुरुवातीच्या ताज्या कलानुसार, टीएमसी 78 आणि भाजपा 58 जागांवर आघाडीवर आहे. बंगालमधील एकूण 136 जागांचे सुरुवातीचे कल सध्या हाती आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. बहुमतासाठी १४८ चा जादूई आकडा गाठावा लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने २११ जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेसला ४४, डाव्या पक्षांना २६ आणि भाजपला अवघ्या तीन जागांवर विजय मिळाला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com