Nandigram Assembly Constituency : नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी

Nandigram Assembly Constituency : नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी
ममता बॅनर्जी

दिल्ली | Delhi

पश्चिम बंगालमध्ये परत एकदा तृणमूल काँग्रेस सत्तेत येणार का भाजप आपली सत्ता आणणार? हे चित्र आज स्पष्ट होत आहे.

पश्चिम बंगालमधील २९४ पैकी २९२ विधानसभा जागांचे निकाल आज हाती येणार आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून करोनाच्या संकटातही पार पडलेल्या या निवडणुकीचा निकाल काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

दरम्यान, नंदीग्राममध्ये पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी १५०० मतांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचे सुवेंदू अधिकारी आणि ममता बॅनर्जी यांच्यावर काँटे की टक्कर सुरु असून आतापर्यंत पिछाडीवर असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे.

पश्चिम बंगालच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये तृणमूल काँग्रेस २०० च्या पार गेली आहे. २०६ जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर असून भाजप ८३ जागांवर पुढे आहे. तर काँग्रेसला १ जागांवर आघाडी मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com