Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याVideo : नांदगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीच एकनाथ शिंदेंसोबत - बंडखोर आमदार सुहास...

Video : नांदगावचा चेहरा मोहरा बदलण्यासाठीच एकनाथ शिंदेंसोबत – बंडखोर आमदार सुहास कांदे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नांदगाव विधानसभा मतदार संघाचे (Nandgaon Vidhansabha) शिवसेना आमदार सुहास कांदे (Shivsena mla suhas kande) सध्या बंडखोर आमदारांच्या गटात समील झाले आहेत. गुवाहाटी (Guwahati) येथे हे सर्व बंडखोर आमदार आहेत. आज आमदार कांदे यांचा एक व्हिडीओ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट केला आहे. या व्हिडीओमध्ये आमदार कांदे यांनी का या गटात आपण सामील झालो आहोत याबबत स्पष्टीकरण दिले आहे…(nandgaon shivsena rebel mla suhas kande video tweet by eknath shinde)

- Advertisement -

ते म्हणाले, की माझ्या नांदगाव मतदारसंघातील विविध विकास योजना मार्गी लागल्या पाहिजेत यासाठी मी हा निर्णय घेतला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsenapramukh Balasaheb Thackeray) यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलेलो आहोत.

एकनाथ शिंदे वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत जे काही गैरसमज पसरवले जात आहेत त्याला जनतेने आणि सर्वसामान्य शिवसैनिकांनी बळी पडू नये अशी विनंतीदेखील आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांनी एका व्हिडीओद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या