नांदगाव तालुक्यातील जवानाला नवशेरा सेक्टरमध्ये वीरमरण

jalgaon-digital
1 Min Read

नांदगाव/मनमाड | प्रतिनिधी

कर्तव्य बजावत असताना डोंगरावरून पाय घसरून नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील जवानाला वीरमरण आले आहे. काल (दि ) रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून सुरेश घुगे असे शहीद जवानाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जम्मु येथे रात्री नऊच्या सुमारास नांदगाव तालुक्यातील अस्तगाव येथील जवान सुरेश घुगे कर्तव्य बजावत होते. याच वेळी त्यांचा पाय घसरून डोंगरावरून कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला होता.

खराब हवामानामुळे विमानाने त्यांचे पार्थिव आणतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याबाबत अधिकृतपणे निर्णय तेथील लष्करी अधिकारी घेणार असून लवकरच याबाबतची माहिती समोर येईल.

घुगे यांच्या नातेवाईकांना पहाटे दूरध्वनीवरुन माहिती कळविण्यात आली. या घटनेची वार्ता सोशल मीडियात व्हायरल झाल्यानतर सर्व स्तरातून जवानाला श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली असल्याने त्यांना तत्काळ लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे या घटनेत निधन झाले.

घुगे 2006 साली सेनेत दाखल झाले होते. मराठा बटालियनमध्ये ते कार्यरत होते. सध्या जम्मू काश्मीरच्या नवसेरा सेक्टर मध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्च्यात आई, वडील, पत्नी आणि 9 वर्षाची मुलगी, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *