Video : आमदार कांदेंना छोटा राजनच्या नावे धमकी ही केवळ 'स्टंटबाजी'; अक्षय निकाळजे म्हणाले...

भुजबळ-कांदे
भुजबळ-कांदे

नाशिक | प्रतिनिधी Nashik

घोटी टोलनाका (Ghoti Toll Plaza) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) (Republican party of india a) च्या काही कार्यकर्त्यांना मारहाण झाल्यामुळे आ. सुहास कांदे (MLA Suhas kande) यांना फोन करून विचार केली असता त्यांनी मला धमकी दिली आणि उलट मी त्यांना भुजबळ यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाखल केलेली नोटीस मागे घेण्यासाठी धमकावले याबाबत पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करत माझी बदनामी केली आहे. याबाबत मी आमदार कांदे यांच्याविरुध्द तक्रार करून मानहानीचा दावा टाकणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे मुंबई प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांनी सांगितले आहे....

जिल्हा नियोजन निधीच्या निधी वाटपावरून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या येवला मतदार संघासाठी जास्त निधी ताब्यात घेऊन नांदगाव मतदारसंघाला कमी निधी दिला असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला होता. त्याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली होती. दोघांच्या या वादामध्ये कुख्यात गुंड छोटा राजनचा पुतण्या अक्षय निकाळजे याच्याकडून ती याचिका मागे घेण्यासाठी धमकी दिल्याचा फोन आला असल्याची तक्रार आमदार कांदे यांनी पोलीस आयुक्तांना दिली होती. मात्र, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) चे मुंबई प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे (Akshay Nikalje) यांनी पत्रकार परिषद घेत या विषयी स्पष्टीकरण दिले आहे. अशा प्रकारे कांदे भुजबळ प्रकरणात नवी बाजू समोर आली आहे...

निकाळजे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मी फोन केला पण टोल नाक्यावर माझ्या कार्यकर्त्याना मारहाण केली त्यासाठी त्यांना फोन केला होता.हा टोल नाका आमदार सुहास कांदे यांचे भाऊ चालवतात; यासाठी फोन केला होता. मी फोनवर कुठलीही धमकी दिली नाही.

तसेच मी कधीही मंत्री छगन भुजबळ यांना कधी भेटलो सुद्धा नाही. मी गेले चार- पाच वर्षे रिपब्लिकन पक्षाचे काम करतो आहे. राज्यात पक्षाचा विस्तार झाला आहे. युवकांमध्ये माझे चांगले स्थान आहे. आजवर माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही. कांदे हे जर आमदार आहेत, तर त्यांनी रचलेले कुभांड अतिशय हीन आहे. त्यांचा हा प्रकार राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या सरकारसाठी देखील चांगला नाही.

त्याची चौकशी झाली पाहिजे. अगदी सीबीआय चौकशी व्हावी. कॅाल रेकॅार्डींग (Call Recording) तपासले जावे. कांदे यांच्याशी संबंधीत टोल नाक्यावर कार्यकर्त्यांना मारहान करण्यात आली. त्यातील हा प्रकार आहे.माझी बदनामी करणाऱ्या आमदार कांदे यांचीच मी तक्रार देणार आहे. तसेच माणहाणीचा दावा न्यायालयात करणार आहे. त्यांनी लोकप्रियतेसाठी हे केलं आहे, असा आरोपही अक्षय निकाळजे यांनी केला आहे.

दरम्यान, याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, लोकांना भुजबळांवर टीका केल्यावर मिडिया व्हल्यू मिळते; पण मी गेली ५० वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहे, असले हीन आरोप केल्याने ते सर्व धुळीस मिळते मात्र, पब्लिक सब जानती है असे म्हणत आ कांदे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.

तसेच मी भाई युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी कधीच नव्हतो. माझं नाव घेऊन खोटे आरोप केले गेले. मी भुजबळ यांचे नाव घेतले नाही असे कांदे नेहमी म्हणतात.

मात्र, संदर्भ माझ्याच नावाचा देतात. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यकडे सर्व चौकशी करण्याची मागणी केली आहे. आज दुपारी अडीच वाजता अक्षय निकाळजे आणि आरपीआय ने पत्रकार परिषद घेतली. घोटी टोल नाक्यावर कांदे यांच्यां कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती त्यात महिला देखील जखमी झाली होती.

उलट कांदे यांनीच दमदाटी केल्याचा आरोप निकाळजे यांनी केला. मी आमदार आहे तुला धडा शिकवीतो असा दम दिला आहे. भुजबळ यांच्यांशी चर्चा झाली नाही, असे निकाळजे यांनी स्पष्ट केलं आहे. राजकारणात बदनाम करण्यासाठी खोटं आरोप लावतात याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्यां कडे केली असे भुजबळ यांनी सांगितले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com