Monday, April 29, 2024
Homeमहाराष्ट्रCrime News : मुलीचा लव्ह मॅरेजचा अट्टहास, बापाने रागाच्या भरात लेकीला संपवलं...

Crime News : मुलीचा लव्ह मॅरेजचा अट्टहास, बापाने रागाच्या भरात लेकीला संपवलं अन्…

नांदेड | Nanded

महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात ऑनर किलींगच्या (Honour Killing ) घटनेमुळे संपुर्ण राज्य हादरला आहे. मुलीने वडिलांच्या इच्छे विरुध्द लग्नाचा हट्ट धरल्याने जन्मदात्या पित्यानेच आपल्या पोटच्या मुलीची क्रूरतेने हत्या केली. एवढचं नाही तर मृतदेह जाळून टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. ही घटना आठ दिवसांपुर्वी घडली.

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील मनुतांडा येथे २ ऑगस्ट रोजी अंगावर शहारे आणणारी घटना घडली. या प्रकरणी मृत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मुक्रमाबाद पोलिसांनी आरोपी पित्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी पित्याला गुरूवारी रात्री पोलिसांनी अटक केली आहे. अण्णाराव गोविंद राठोड (45) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पित्याचे नाव आहे. माझी मुलगी आजारी होती. आजाराला कंटाळून तिने गळफास घेतला. त्यामुळे घाई गडबडीने तिचा अंत्यविधी केल्याचा बनाव आरोपी वडिलांकडून केला जात होता. अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत हत्येचा उलगडा केला.

‘औरंगजेब स्टेटस’चं भूत उतरता उतरेना! राहुरीत एकावर गुन्हा दाखल

मृत मुलगी ही १६ वर्षांची होती. तिचे मुखेड तालुक्यातील राजुरा तांडा येथील नातेवाईक असलेल्या एका मुलाशी प्रेम संबंध होते. मात्र, त्यांच्या लग्नाला तिच्या वडिलांचा विरोध होता. मात्र, तिने त्यांच्या कडे त्याच मुलासोबत लग्न करण्याचा अट्टहास धरला. दरम्यान, मुलीचा राग आल्याने पित्याने २ ऑगस्टला घरीच तिच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याने मुलीचा मृतदेह हा थेट शेतात जाऊन जाळून टाकला. दरम्यान, त्याने घरातील रक्त आणि पाण्याचे डाग पुसले. तसेच कोयत्याची देखील विल्हेवाट लावली. हा सर्व प्रकार मुलीच्या आईसमोर झाला. दरम्यान, तिने याला विरोध केल्याने तिला देखील मारून टाकण्याची धमकी त्याने दिली. दरम्यान, मुलीने नैराश्यातून आत्महत्या केल्याचा बनाव त्याने रचला. यामुळे घाईत अंत्यविधी उरकल्याची बतावणी देखील केली.

अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?; संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

मात्र, मुलीच्या मृत्यूनंतर गावात चर्चा सुरू झाल्या होत्या. याची कुणकुण पोलिसांना देखील लागली. पोलिसांनी गुप्तपणे तपास सुरू केला. ९ ऑगस्टला तांड्यातील काही लोकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता मुलीला जाळण्यात आले, त्या ठिकणी जाऊन हाडाचे नमुने व राख प्रयोगशाळेत तपासणीसाठी देण्यात आले. त्यानंतर मृत मुलीच्या आईला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईंने पोलिसात तक्रार दिली असून यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या