नॅन्सी पेलोसी तैवान मध्ये दाखल; चीन आणि अमेरिकेत तणाव वाढणार?

नॅन्सी पेलोसी तैवान मध्ये दाखल; चीन आणि अमेरिकेत तणाव वाढणार?

चीनच्या ( China )धमकीनंतरही अमेरिकेच्या सभागृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (US House Speaker Nancy Pelosi)तैवानमध्ये पोहोचल्या आहेत. चीनकडून लाखो इशारे देऊनही पेलोसी यांचे विमान मंगळवारी संध्याकाळी तैपेई येथे उतरले.

पेलोसी यांच्या दौऱ्यावर चीनने गंभीर आक्षेप घेतला असून पेलोसी यांचा तैवान दौरा म्हणजे शांतता आणि स्थिरतेला धोका आहे. स्वतंत्र तैवानची मागणी करणाऱ्या फुटीरतावादी कारवायांचा चीन कठोर विरोध करतो, तैवाना भेट म्हणजे चीनच्या अंतर्गत ढवळाढवळ आहे. हा दौरा म्हणजे शांतता आणि तैवानमधील स्थिरतेला धोका आहे. या दौऱ्यामुळे चीन आणि अमेरिकेच्या संबंधांवर गंभीर परिणाम होतील असे चीनने म्हटले आहे.

चीनच्या इशाऱ्यानंतरही पेलोसीचं विमान तैवानमध्ये उतरलं या मुळे जगातील दोन महासत्तांमधील तणाव वाढणार असल्याचे चिन्ह दिसत आहे

अमेरिकी संसदेच्या प्रतिनिधीगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांनी तैवानच्या स्वशासित बेटाला भेट दिल्याने दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढू शकतो.

चीनकडून लाखो इशारे देऊनही पेलोसीचे विमान मंगळवारी संध्याकाळी तैपेई येथे उतरले. विशेष म्हणजे, पेलोसी यांनी तैवानला भेट दिल्यास अमेरिकेने गंभीर परिणामांना सामोरे जाण्यास तयार राहावे, असे चीनने आधीच सांगितले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com