
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सिन्नर-शिर्डी महामार्गावर (Sinnar Shirdi Highway) एक भीषण अपघात (Accident) घडला आहे. पाथरे गावानजीक हॉटेल वनराई जवळ खासगी आराम बस आणि ट्रकचा अपघात झाला आहे...
अपघात इतका भयंकर होता की दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला आहे. यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
ठाणे अंबरनाथ परिसरातून सदर बस शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना वावी पाथरे दरम्यान टोल नाक्याच्या पुढे एकेरी वाहतूक असल्याने हा अपघात समोरासमोर झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात एकूण ४५ प्रवासी होते. आता मृतांची नावे समोर आली आहेत.
मृतांची नावे पुढीलप्रमाणे :
१) प्रमिला प्रकाश गोंधळी,वय-४५,
२) वैशाली नरेश उबाळे, वय ३२,
३) श्रावणी सुहास बारस्कर,वय ३०,
४) श्रध्दा सुहास बारस्कर, वय-४
५) नरेश मनोहर उबाळे,वय-३८ या सर्व रा.अंबरनाथ
६) बालाजी कृष्णा मोहंती, वय-२५
७)दिक्षा संतोष गोंधळी, वय-१८ रा.कल्याण
८) आयुष्मान ऊर्फ साई प्रशांत महंती, वय-५ वर्ष
९) रोशनी राजेश वाडेकर, वय-३०
उर्वरित एकाची अद्याप ओळख पटलेली नाही.
अपघात ग्रस्तांवर पुढील रुग्णालयात उपचार सुरू
मातोश्री हॉस्पिटल-०३
डॉ. साळुंखे हॉस्पिटल-०१
यशवंत हॉस्पिटल-१६
एकूण- २० प्रवाशांवर उपचार सुरू असून
सिन्नर रुग्णालयातून चार प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. तसेच अपघाताची चौकशी करण्याचेदेखील निर्देश त्यांनी दिले आहेत.
अपघातात होणारी वाढ चिंताजनक : छगन भुजबळ
नाशिक शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही बातमी अतिशय दुःखदायक आहे. या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने चांगले उपचार मिळावे. अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना मदत घोषित करण्यात आलेली आहे.
ही मदत लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबियांना मिळावी. रस्ते अपघातात होणारी वाढ हा अतिशय चिंतेचा विषय बनला असून यावर आता ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो, असे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.