
मुंबई | Mumbai
हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Hinduday Emperor Balasaheb Thackeray) समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Highway) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते रविवार (दि.११) डिसेंबर रोजी लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आता एसटी महामंडळाने (ST Corporation) समृध्दी महामार्गावरून नागपुर ते शिर्डी बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे....
समृद्धी महामार्गावरुन उद्यापासून (गुरुवार) एसटी महामंडळाच्या नागपूर ते शिर्डी बस (Nagpur to Shirdi Bus) सेवेला सुरुवात होणार असून यामुळे सामान्य नागरिकांना कमी वेळात आणि कमी दरात समृद्धीचा प्रवास अनुभवता येणार आहे. नागपूर ते शिर्डी प्रवासाकरिता नागरिकांना तेराशे रुपये मोजावे लागणार आहेत.
तसेच नागपुर ते शिर्डी प्रवास करण्यासाठी नागपूर येथील गणेशपेठ आगारात महामंडळाकडून दोन स्लीपर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ही बस रात्री नऊ वाजता नागपूरवरून सुटल्यानंतर पहाटे पाच वाजता शिर्डीला पोहचणार आहे. तर रात्री ९ वाजता बस शिर्डीहून सुटल्यानंतर दुस-या दिवशी नागपूरला पोहचेल.