नगराध्यक्ष निवड : तीन जागा बिनविरोध; उर्वरित तीन ठिकाणी 'इतके' अर्ज

माघारीकडे लक्ष, आदिवासी बहुल भागात किंगमेकर कोण ठरणार?
नगराध्यक्ष निवड : तीन जागा बिनविरोध; 
उर्वरित तीन ठिकाणी 'इतके' अर्ज

नाशिक |प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये (six nagarpanchayat adhyaksha election) नगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रिया राबवण्यात येत असून मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत १० इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत....

कळवण (kalwan), निफाड (Niphad) आणि देवळा (Deola) नगरपंचायतीसाठी प्रत्येकी एकच अर्ज प्राप्त झाल्याने तेथे नगराध्यक्षपदाची निवड अविरोध होणार, हे निश्चित आहे. अन्य नगरपंचायतींमध्ये मात्र माघार कोणाची होते याकडे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील कळवण (Kalwan, पेठ (Peth), सुरगाणा (Surgana), देवळा (Deola), दिंडोरी (Dindori) आणि निफाड (NIphad) या नगरपंचायतीमध्ये काही दिवसांपूर्वीच निवडणूक झाली. या नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष म्हणून कोण काम पाहणार? हे नगराध्यक्ष पदाच्या निवडीनंतर निश्चित होणार आहे. प्रशासनाकडून नगराध्यक्षपदासाठी निवड प्रक्रीया राबवण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी (दि. ८) अखेरची मुदत होती. अखेरच्या दिवसापर्यंत ६ नगरपंचायतीसाठी एकूण १० अर्ज प्राप्त झाले.

कळवण नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या कौतिक पगार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. निफाडमध्ये शहर विकास आघाडीच्या रुपाली रंधवे यांचा एकमेव अर्ज दाकल झाला. यासह देवळा नगराध्यक्षपदासाठी भारती आहेर या भाजपच्या उमेदवारांचा एकच अर्ज प्राप्त झाल्याने या तीन ठिकाणी निवडणूक अविरोध होणार हे निश्चित झाले आहे. परंतु अन्य तीन नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्षपदासाठी चुरस असणार आहे.

दरम्यान, दिंडोरीत तीन, पेठ आणि सुरगाण्यात प्रत्येकी दोन जण इच्छुक आहेत. त्यामुळे या नगरपंचायतींमध्ये आता अर्ज माघारीकडे लक्ष लागले आहे. आदिवासी भागातील सुरगाणा या नगरपंचायतीसाठी भारतीय जनता पक्षासह शिवसेनेच्या उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार कोणाला मत देतात याकडे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com