नगराध्यक्ष व सरपंच निवड थेट जनतेतूनच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

नगराध्यक्ष व सरपंच निवड थेट जनतेतूनच - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

मुंबई । Mumbai

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे - फडणवीस सरकारने (Shinde - Fadnavis government) महाविकास आघाडीने (Mahavikas aaghadi) घेतलेल्या निर्णयांना ब्रेक लावला आहे. महाविकास आघाडीने रद्द केलेला निर्णय आज पुन्हा एकदा शिंदे सरकारने बदलला आहे. यापुढे थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पत्रकार परिषदेत केली....

कॅबिनेटची बैठक (Cabinet meeting) पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) माध्यमांशी बोलत होते.

भाजप सरकारने (BJP Goverment) २०१८ मध्ये राज्यातील नगराध्यक्ष आणि ग्रामपंचायतीतून सरपंचाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यात २०१९ मध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने पहिल्या अधिवेशनात हा निर्णय बदलला होता.

दरम्यान, त्यानंतर आज शिंदे - फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका देत राज्यात यापुढे होणाऱ्या निवडणुकांमध्ये थेट जनतेतून सरपंच (Sarpanch) व नगराध्यक्षांची (nagaradhyaksha) निवडणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com