नाफेडची कांदा खरेदी सुरू

नाफेडची कांदा खरेदी सुरू

उमराणे । वार्ताहर Umrane

सरकारचे धोरण आहे की शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे म्हणून नाफेड ने बाजार समितीमध्ये होत असलेल्या लिलावात प्रत्यक्ष सहभागी व्हावे त्यामुळे स्पर्धा वाढेल व शेतकर्‍यांना योग्य भाव मिळून शेतकर्‍यांचा फायदा होईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी येथे बोलताना केले.

उमराणे येथील शिवप्रसाद लऑन्स आवारात नाफेडतर्फे 3 लाख मेट्रिक कांदा खरेदीचा शुभारंभ केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुरेश निकम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती धर्मा देवरे माजी सरपंच बाळासाहेब देवरे यांनी शेतकर्‍यांच्या कांद्याच्या भावाबद्दल व पेमेंटबद्दल अडचणी मांडल्या. डॉ. पवार यांनी तत्काळ सूचना केल्या या सूचनेनुसार कांद्याला अकराशे 56 रुपये क्विंटल भाव मिळाला याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीयमंत्री पियुष गोयल व तोमर यांचे आभार मानले 2020 मध्ये 87 हजार मेट्रिक टन 21 मध्ये एक लाख 85 हजार मॅट्रिक टन 2022 मध्ये 2 लाख 38 हजार मॅट्रिक टन नाफेड ने कांदा खरेदी केला.

यावर्षी कांद्याचे उत्पादन जास्त झाल्याने तीन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला जाणार असल्याचे डॉ पवार यांनी जाहीर केले कांद्याची कोणत्याही प्रकारची निर्यात बंदी झालेली नसून बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्याने या देशांनी आयात बंदी केली आहे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचा राजकारण न करता शेतकर्‍यांचे प्रश्न कसे सुटतील यावर राजकारण्यांनी विचार करावा असे आवाहन त्यांनी शेवटी बोलताना केले.

प्रास्ताविक कृषीभूषण अ‍ॅ‍ॅग्रो चे भूषण निकम यांनी केले ह्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश निकम ,उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रशांत देवरे, अरुण माऊली पाटील, नाफेडचे अधिकारी पंकज कुमार , निखिल फडादे , एन सी सी एफ चे जोसेफ ,एम एम परिक्षीत यांची भाषणे झाली कार्यक्रमास व्यापारी असोसिएशन जिल्हाध्यक्ष खंडू पंडित देवरे उपसभापती धर्मा देवरे ,माजी सभापती रतन देवरे ,माजी सरपंच प्रकाश ओस्तवाल ,माजी सभापती राजेंद्र देवरे, व्यापारी संचालक सुनील देवरे , माजी सरपंच दिलीप देवरे ,दत्तू देवरे बाळासाहेब देवरे ,माजी सभापती डॉ आत्माराम कुंभार्डे , रामेश्वर कृषी मार्केटचे पंकज ओस्तवालआदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com