Friday, April 26, 2024
Homeनाशिकमाझे कुटुंब, माझी जबाबदारी आजपासून मोहीम

माझे कुटुंब, माझी जबाबदारी आजपासून मोहीम

नाशिक । प्रतिनिधी

नाशिक महापालिका क्षेत्रात करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन तो नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे नाशिक महानगरपालिकेकडुन आज (दि.15) माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहीमस प्रारंभ करण्यात आला.

- Advertisement -

यांतर्गत शहरातील 4 लाख 40 हजार 158 घरांना भेटी देऊन त्यांचा आरोग्य सर्व्हे केला जाणार असुन यानिमित्ताने शहरातील 19 लाख लोकांपर्यत पोहचण्याचे काम केले जाणार आहे.

शासनाच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रात महापालिका आरोग्य वैद्यकिय विभाग व सामाजिक संस्थांच्या मदतीने ही मोहीम राबविली जात आहे.

करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यातील प्रत्येक व्यक्तीपर्यत पोहचून आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने आजपासुन ते 10 आक्टोंबर पर्यत ही मोहीम राबविली जाणार आहे.

करोना नियंत्रणांसाठी विविध उपाय योजना व जनजागृती सुरु असुन आता सर्वच व्यक्ती व कुटंबापर्यत पोहचून माझे कुटुंब, माझी जबाबदारी हा महत्वपुर्ण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे शेवटच्या घटकापर्यत पोहचून त्या व्यक्ती – कुटुंबापर्यत जाऊन माहिती घेतली जाणार आहे.

यात प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींची तपासणी करतांना ताप व शरिरातील ऑक्सीजनची पातळी नोंदवीली जाणार आहे. तसेच करोनापासुन बचावासाठी त्या कुटुंबाला आरोग्य शिक्षण दिले जाणार आहे.

तसेच तपासणीतून करोना सदृश व्यक्त शोधण्यात येणार असुन त्याला उपचारासाठी रुग्णालयात पाठविले जाणार आहे. त्याचबरोबर रक्तदाब, हद्ययविकार, मधुमेह, लठ्ठपणा, किडणीचे आजार असलेल्या व्यक्तींना शोधून त्यांनाही देखील उपचारासाठी रुग्णालयात पाठविले जाणार आहे.

याकरिता महापालिकेचे 549 पथके कार्यरत झाली असुन 750 थर्मल स्कॅनर व 750 पल्सआॅक्सी मीटरचा वापर केला जाणार आहे. याप्रमाणे आजपासुन ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या