मविप्र निवडणूक : केटीएचएमच्या बाहेर वाहने पार्क करू नका, अन्यथा...

मविप्र निवडणूक : केटीएचएमच्या बाहेर वाहने पार्क करू नका, अन्यथा...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मविप्रत 'प्रगती'च राहणार की 'परिवर्तन' होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....

या निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली असून जिल्ह्याभरातून कार्यकर्त केटीएचएममध्ये दाखल होत आहे. सभासद आणि समर्थकांनी केटीएचएमच्या मेनगेट जवळ आपली वाहने पार्क करू नये.

पार्किंगची व्यवस्था रावसाहेब थोरात सभागृहाच्या पार्किंगमध्ये आणि केटीएचएमच्या मागील पार्किंगमध्ये करण्यात आली आहे. तरी समर्थकांनी आपली वाहने रावसाहेब थोरात पार्किंग आणि केटीएचएमच्या मागील पार्किंगमध्ये पार्क करून सहकार्य करावे, अन्यथा ही वाहने टोईंग करण्यात येतील, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com