Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्र निवडणूक : आमदार माणिकराव कोकाटेंची माघार

मविप्र निवडणूक : आमदार माणिकराव कोकाटेंची माघार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत (Maratha Vidya Prasarak Samaj Shikshan Sanstha Election) दाखल अर्जांमधून माघारीस कालपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी चार उमेदवारांनी माघार घेतली होती. तर आज दुसऱ्या दिवशी १९ उमेदवारांनी माघार घेतली आहे….

- Advertisement -

यात आमदार माणिकराव कोकाटे यांचाही समावेश असून त्यांनी सभापती पदासाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. मात्र त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज कायम ठेवला आहे.

दरम्यान, शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस असून निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. आज दोन्ही पॅनल प्रमुखांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. यातून इच्छुक उमेदवारांना काही तालुके वगळता उमेदवारीचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

सहा पदाधिकाऱ्यांपैकी दोन तीन पदाधिकारी पदाचे उमेदवार निश्चित करण्याचे काम दोन्ही पॅनलकडून सुरु आहे. यातून शुक्रवारी दि. १९ अंतिम उमेदवारी निश्चित होईल.

यांनी घेतली माघार

ॲड. माणिकराव शिवाजीराव कोकाटे (सभापती)

मनिषा दामोधर पाटील (उपाध्यक्ष)

डॉ. जयंत त्र्यंबकराव पवार (उपाध्यक्ष, उपसभापती व चिटणीस)

विजय वामनराव कडलग (इगतपूरी तालुका सदस्य)

मालेगाव तालुका सदस्य : साहेबराव गजानन हिरे, अरूण निंबा देवरे, अशोक जगन्नाथ निकम, सुधाकर बाबुराव निकम.

येवला तालुका सदस्य : रायभान गंगाधर काळे, राजेंद्र विश्वनाथ शिंदे, सुनिल वसंतराव पाटील.

नाशिक ग्रामीण सदस्य : जयराम तोलाजी शिंदे, मोहनराव पोपटराव पिंगळे.

उच्च माध्य. व महाविद्यालयीन सेवक सदस्य : संजय सुकदेव पवार, दिलीप संपतराव माळोदे, दिलीप पुंडलिक पवार.

प्राथ. व माध्य. सेवक सदस्य : संगिता संजय डेर्ले.

- Advertisment -

ताज्या बातम्या