Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामविप्र निवडणूक : ...अखेर मतमोजणीस प्रारंभ

मविप्र निवडणूक : …अखेर मतमोजणीस प्रारंभ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले. मविप्रत ‘प्रगती’च राहणार की ‘परिवर्तन’ होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे….

- Advertisement -

सकाळपासून गठ्ठ्यांची विभागणी केली जात होती. विभागणी नुकतीच पूर्ण झाली आहे. आता पहिल्या फेरीच्या मतमोजणी अखेर सुरुवात झाली आहे. मतमोजणी स्थळी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष मतमोजणी सुरू करण्यापूर्वी महावितरणचे वीज कनेक्शन बंद करण्यात येऊन जनरेटर सुरू करण्यात आले. मतमोजणी पूर्ण होइपर्यंत जनरेटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

मागील निवडणुकीच्यावेळी झालेल्या मतमोजणीच्या वेळीच वीज पुरवठा खनदीत झाला होता. यामुळे यावेळच्या मतमोजणीच्या वेळी असा प्रकार होऊ नये, म्हणून विरोधकांनी जनरेटर सुरु ठेवण्याची मागणी केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

मतमोजणीच्या वेळी परिवर्तन पॅनलचे उमेदवार जातीने हजर आहेत. लवकरच पहिल्या फेरीचा निकाल हाती येईल. त्यामुळे निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या