मविप्र निवडणूक : मतमोजणी स्थळी वाद

मविप्र निवडणूक : मतमोजणी स्थळी वाद

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

एकशे आठ वर्षे बहुजन समाजाच्या हितासाठी 'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले.

आज निवडणुकीचा निकाल असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. मतमोजणी स्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जिल्हाभरातुन हजारो कार्यकर्ते केटीएचएम जवळ दाखल होत आहे. अशातच मतमोजणी स्थळी वाद झाल्याची माहिती मिळत आहे.

इगतपुरी तालुक्यातील 132 सभासदांचे मतदान झाले आहे; मात्र मतमोजणी पूर्वी गठ्ठे तयार करत असताना त्यामध्ये एक मतपत्रिका कमी असल्याचे आढळून आले असून त्यांची मोजणी केली असता ती 131 असल्याचे निदर्शनास आले.

यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला आहे. याबाबत इगतपुरी तालुक्यातील संचालक पदाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी स्वतः उपस्थित होत पुन्हा तपासण्याची मागणी केली.

अशीच परिस्थिती दुसऱ्याही टेबलवर घडली असून त्यात अध्यक्षपदाची एक मतपत्रिका गहाळ असल्याचे समोर आले होते; मात्र ती मतपत्रिका आढलून आल्याने मतमोजणी सेवकांना हायसे वाटले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com