मविप्र निवडणूक : ...तर मतमोजणी सुरू करू नका

मविप्र निवडणूक : ...तर मतमोजणी सुरू करू नका

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या ( Maratha Vidya Prasarak Samaj Sanstha Elections) कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता काल मतदान झाले.

आज निवडणुकीचा निकाल असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. इगतपुरी तालुक्यातील 132 सभासदांचे मतदान झाले आहे; मात्र मतमोजणी पूर्वी गठ्ठे तयार करत असताना त्यामध्ये एक मतपत्रिका कमी असल्याचे आढळून आले असून त्यांची मोजणी केली असता ती 131 असल्याचे निदर्शनास आले. यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला आहे.

मविप्र निवडणूक : ...तर मतमोजणी सुरू करू नका
मविप्र निवडणूक : मतमोजणी स्थळी वाद

अशीच परिस्थिती दुसऱ्याही टेबलवर घडली असून त्यात अध्यक्षपदाची एक मतपत्रिका गहाळ असल्याचे समोर आले होते. उपाध्यक्ष, सभापती आणि उपसभापती यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण ३ चिठ्ठ्या नसल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे. उमेदवारांनी याबाबत तक्रार केली असून या चिठ्ठ्या सापडल्याशिवाय मतमोजणीस प्रारंभ करू नये, अशी मागणी देखील उमेदवारांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com