मविप्र निवडणूक : 'या' मातब्बरांनी नेले अर्ज; पहिल्याच दिवशी इतके अर्ज विक्री

मविप्र निवडणूक : 'या' मातब्बरांनी नेले अर्ज; पहिल्याच दिवशी इतके अर्ज विक्री

नाशिक। प्रतिनिधी Nashik

मराठा विद्या प्रसारक शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा बिगुल वाजला असून या जिल्हाभरातील विविध गावांमध्ये विखुरलेले तब्बल 10 हजार 191 संस्थेचे सभासद या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया कालपासून (दि.5) सुरू झाली. इच्छुक उमेदवारांनी आजपासूनच उमेदवारी अर्ज घेण्यासाठी केली होती....

मविप्र निवडणूक : 'या' मातब्बरांनी नेले अर्ज; पहिल्याच दिवशी इतके अर्ज विक्री
मविप्र सेवकांना महागाई भत्ता वाढ द्यावी : अ‍ॅड. ठाकरे

या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस सभापती, उपसभापती या प्रमुख पदांसह 13 तालुका संचालक, तीन शिक्षक संचालक निवडले जाणार आहेत. यात सरचिटणीस पदासाठी प्रमुख लढत होत असून याच लढतीकडे नाशिकसह संपूर्ण राज्यातील शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निफाड बागलाणमध्ये सर्वाधिक मतदार

मविप्रच्या मतदारांमध्ये निफाड तालुक्यात सर्वाधिक 2903 मतदार असून त्याखालोखाल सटाणा तालुक्यात 1416 मतदार आहेत. त्याचप्रमाणे नाशिक शहर 876, मालेगाव 783, देवळा 597, चांदवड 684, इगतपुरी 138, येवला 202, नाशिक ग्रामीण 707, 443, दिंडोरी व पेठ 883, कळवण व सुरगाणा 384, नांदगाव 292, असे एकूण 10 हजार 197 मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

या मातब्बरांनी नेले अर्ज

पहिल्याच दिवशी आजी माजी संचालकांकडून अर्ज नेण्यात आले. यामध्ये माणिक कोकाटे, हेमंत वाजे, कृष्णाजी भगत, अशोक मुरकुटे, भाऊसाहेब खताळे या मातब्बरांनी पहिल्याच दिवशी अर्ज नेले.

सर्वच इच्छुकांकडून सक्षम पॅनलमध्ये निश्चित स्थान मिळवण्यासाठी भेटीगाठींना वेग आला आहे. मविप्रच्या 10 हजार सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुकांची मोठी दमछाक होणार असतानाच पॅनलमध्ये जागा मिळवण्याची इच्छुकांची मोठी धडपड सुरू असल्याचे चित्र आहे. अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.5) जनरल गटाच्या एकूण 21 जागांसाठी 138 जणांनी उमेदवारी अर्ज घेतले.

मविप्र निवडणूक : 'या' मातब्बरांनी नेले अर्ज; पहिल्याच दिवशी इतके अर्ज विक्री
मविप्र विद्यार्थीभिमुख संस्था: नीलिमा पवार

तर सेवक गटाच्या तीन जागांसाठी आठ जणांनी उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 28 ऑगस्टला जिल्ह्यातील 14 मतदार केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर 29 ऑगस्टला सकाळी आठ वाजेपासून संस्थेच्या आवारात या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

मविप्र निवडणूक : 'या' मातब्बरांनी नेले अर्ज; पहिल्याच दिवशी इतके अर्ज विक्री
बहुप्रतीक्षित 'मविप्र'ची निवडणूक जाहीर; अशी असेल निवडणूक प्रक्रिया

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. भास्करराव चौरे काम पाहत आहेत. तर त्यांच्या सोबत सहाय्यक अधिकारी म्हणून अ‍ॅड.आर. खांंदवे, अ‍ॅड. महेश पाटील हे तर सचिव म्हणून ज्ञानेश्वर काजळे हे काम पाहत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com