Thursday, April 25, 2024
Homeजळगावमविप्र संबंधित गुन्ह्यात अ‍ॅड. प्रवीण चव्हाणला अटक

मविप्र संबंधित गुन्ह्यात अ‍ॅड. प्रवीण चव्हाणला अटक

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मविप्र संस्थेशी असलेल्या गुन्ह्यात निलेश भोईटे यांच्या घरावर अवैध छापा टाकल्याप्रकरणी तत्कालीन विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण (Adv. Praveen Chavan) यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला होता. दरम्यान, आज एसआयटीच्या पथकासमोर अ‍ॅड. चव्हाण हे हजर होण्यासाठी गेले असता, एसआयटीच्या पथकाने त्यांना चाळीसगाव येथून ताब्यात (arrested) घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यामुळे अ‍ॅड. चव्हाण यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.

- Advertisement -

भुसावळच्या ‘या’ कनिष्ठ कॉलेजात शिक्षकांची बोगस भरती?

मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या संचालकांचे राजीनामे घेऊन संस्था माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या ताब्यात द्यावी यासाठी दबाव टाकून अ‍ॅड. विजय पाटील, महेश पाटील यांचे अपहरण करत त्यांना पुण्यातील एका फ्लॅटमध्ये डांबून ठेवत मारहाण केली. तसेच त्यांच्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा पुणे कोथरुड पोलिसांकडे वर्ग झाल्यानंतर कोथरुड पोलिसांचे पथक निलेश भोईंटेच्या घरावर छापा टाकण्यासाठी आले होते. यावेळी संशयितांनी भोईटे यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन या प्रकरणासंबंधितचे दस्ताऐवज दाखल करायचे आणि पोलीसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. त्यांच्या घरात रक्ताने माखलेला सूरा ठेवण्याचा कट रचला होता. तसेच वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती दिली होती.

भोईटेंच्या तक्रारीवरुन फसवणूकचा गुन्हा

निलेश भोईटे यांच्या घरातील महत्वाचे दस्ताऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्वाचे दस्तावेज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याप्रकरणी दि. 7 ऑक्टोंबर 2022 रोजी शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन अ‍ॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या प्रकरणात पुणे येथील व्यवसायीक तेजस मोरे यांनी जबाब नोंदवित ऑडीओ क्लिप सादर केली होती.

सावधान : सौदर्यप्रसाधने घेताय… तर ही बातमी महिला व ब्युटीपार्लर चालकांनी वाचलीच पाहीजेआपल्या टिव्ही चॅनल्सची ही दरवाढ पाहीली का ?

दरोड्याचे वाढविले होते कलम

या गुन्ह्याचा तपास करीत असतांना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनिल दत्तात्र्य माळी या संशयिताची संख्या वाढविण्यात आली होती. तसेच या खटल्यात संशयितांवर दरोड्याचे कलम वाढविण्यात आले होते.

हजर होताच पोलिसांनी

घेतले ताब्यात

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर दाखल असलेल्या बीएचआर खंडणी प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटकपुर्व जामीन मंजूर केला आहे. परंतू जामीन देतांना त्यांना एसआयटीसमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रविवारी चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या असलेल्या गुन्ह्यात प्रवीण चव्हाण हे एसआयटीचे प्रमुख पोलीस निरीक्षक तथा चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांच्यासमोर हजर होण्यासाठी गेले असता, पथकाने त्यांना शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. त्यानंतर चाळीसगाव येथून त्यांना पोलिस बंदोबस्तात शहर पोलिस ठाण्यात आणून त्यांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

आक्षेपार्ह फोटो व्हायरलची धमकी देत 15 लाखांची मागितली खंडणीट्रॅक्टर थेट धरणाखाली, चालक ठार

पथकात यांचा होता समावेश

एसआयटीचे प्रमुख तथा चाळीसगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, उपनिरीक्षक सुहास आव्हाड, भूषण पाटील, निलेश पाटील, विनोद खैरनार, ज्ञानेश्वर गीते, रविंद्र बच्छे यांच्या पथकाने प्रवीण चव्हाण यांना जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

जबाब नोंदविल्यानंतर केली अटक

शहर पोलिसांनी अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे बंदद्वार जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर अटकपुर्व त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना शहर पोलिसांनी अटक केली. अ‍ॅड. चव्हाण यांना अटक झाल्याने एकच खळबळ माजली आहे.

अन् सुरु झाल्या अटकेसाठी हालचाली

खंडणीच्या गुन्ह्यात अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांना अटकपुर्व जामीन मिळाला आहे. परंतु दुसर्‍या गुन्ह्यात त्यांना जामीन नसल्याचे कळताच त्यांना लागलीच ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या. चाळीसगाव पोलिसांनी अ‍ॅड. चव्हाण यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलिस बंदोबस्तात शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

अल्पवयीन मुलीवर दबाव टाकून केले अत्याचार

अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्याविरुद्ध चाळीसगाव व शहर पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यापैकी चाळीसगाव येथील गुन्ह्यात त्यांना अटकपुर्व जामीन मंजूर आहे तर शहर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात त्यांना जामीन नसल्याने त्यांना रविवारी अटक करण्यात आली. सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असून ही नियमित कारवाई सुरु आहे.

एम. राजकुमार. पोलीस अधीक्षक,जळगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या