Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यावृद्धाची हत्या करणारा ताब्यात

वृद्धाची हत्या करणारा ताब्यात

सिन्नर । प्रतिनिधी Sinnar

काल सकाळी नांदुरशिंगोटे ते चास रोडवर (( Nandurshingote to Chas Road )) डोंगराळ भागात रोडकडेला पुरुष ईसमाचे शव मिळुन आले होते त्याच्या डोक्यात दगड घालुन खुन केल्याचे निष्पन्न झालेले होते . वावी पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी जावुन म्रुतदेहाची ओळख पटविली सदरचा म्रतदेह हा लोणी येथे राहनारे ईसम भाउसाहेब रंगनाथ आहेर यांचा असलेबाबत निष्प्न्न झालेले झाले.

- Advertisement -

सदरचा प्रकार गंभीर असल्याने वरीष्ट अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी देखिल त्यांचे पथकासह घटनास्थळी धाव घेतली. मयताची ओळख पटलेली होती परंतु मयताचा खुन कुनी केलेला आहे याचा शोध घेने पोलीसासमोर आव्हान होते.

वावी पोलीस ठानेकडील पथके तसेच स्थानिक गुन्हेशाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अनिल धुमसे,पोहवा, रविंद्र वानखेडे,अंमलदार- विनोद टिळे,नवनाथ वाघमोडे, हेमंत गिलबिले,प्रदीप बहीरम असे गुन्हयाचा तपास करीत होते.

सदर गु्न्हयात् तपासकामी नांदुरशिंगोटे परीसर तसेच लोणी येथे जावुन खु्न्याचा माग घेत असतांना पोनि/हेमंत पाटील यांना माहीती मिळाली की सदरचा खुन हा मयत भाउसाहेब रंगनाथ आहेर याचा मित्र रामदास कचरु लोहकरे रा मानोरी याने केलेला आहे त्याप्रमाणे स्थानिक गुन्हेशाखेकडील पथकाने रामदास कचरु लोहकरे याचा नांदुरशिंगोटे गावचे परीसरात शोध घेतला असता तो नांदुरशिंगोटे गावचे आठवडा बाजारात मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीसी खाक्या दाखविताच त्याने मयत यास त्याचे मोटारसायकलवर लोणी येथुन बसवुन आनुन त्यास नांदुर ते चाल जानारे रोडने नेवुन खिंड परीसरात रोडचे बाजुला आडोशाला नेवुन मयताचे डोक्यात दगड घालुन खुन केल्याची कबुली दिलेली आहे. यातील मयत हा आरोपीताचे पत्नीवर वाईट नजर ठेवुन असल्याने त्याचे रागापोटी केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक सचिन पाटील साो, यांचे मार्गदर्शनाखालि पोलीस उपनिरीक्षक , अनिल धुमसे,पोहवा/रविंद्र वानेखेडे,पोना/नवनाथ वाघमोडे,अंमलदार/ विनोद टिळे,हेमंत गिलबिले,प्रदीप बहीरम यांनी केलेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या