नाशकात पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

नाशकात पूर्ववैमनस्यातून एकाचा खून

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

पूर्ववैमनस्यातून नाशिकरोड परिसरातील एकलहरे रोड (Ekalhare Road) येथे मोहित पार्क हॉटेलजवळ दोघा युवकांनी एका 35 वर्षीय युवकाचा मानेवर चाकूने वार करून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना घडली असून याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

एकलहरे रोड येथील मोहित पार्क हॉटेलजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून संशयित आरोपी ज्ञानेश्वर नारायण उमाप (21) व शब्बीर मोहम्मद शेख (रा. चेहेडी पंपिंग, नाशिकरोड) या दोघांनी रंजीत उर्फ टिंकू उर्फ हरभजन ग्राय (रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) याच्याशी जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद केला.

या वादाचे रूपांतर शिवीगाळ व हाणामारीत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या दोघा आरोपींनी टिंकूवर धारदार चाकूने मानेवर वार केल्याने टिंकू हा रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळला. दरम्यान ही घटना समाजताच त्याच्या नातेवाईकांनी व इतर नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान त्याला तपासले असता मयत घोषित करण्यात आले.

ही घटना नाशिकरोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक गणेश नायदे, राजू पाचोरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक गोसावी हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांना पाहताच आरोपी पळून जाऊ लागले. त्यानंतर गुन्हे शोध पथकातील कर्मचारी हवालदार अनिल शिंदे, राकेश बोडके, कुंदन राठोड, गोपनीय खात्याचे सुजित जाधव, हेमंत मेढे यांनी त्वरित आरोपींचा पाठलाग करून त्यांना पकडले.

दोन्ही आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोघे आरोपी मद्यसेवन केले असल्याचे समजते. दारुच्या नशेतच त्यांनी टिंकू ग्राय याचा खून केल्याचे समजते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com