गळा चिरलेल्या अवस्थेत 'तो' धावला एक किमी अंतर

गळा चिरलेल्या अवस्थेत 'तो' धावला एक किमी अंतर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जुना आडगाव नाक्यावरील (Old Adgaon Naka) रामरतन लॉज (Ramratan Lodge) येथील बंद गाळ्यासमोर अनोळखी इसमाची अज्ञातांनी गळा चिरून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे...

हत्या झालेला युवक हा जुना आडगाव नाका ते सेवा कुंजपर्यंत जवळपास एक किमी पळत गेला. रस्त्यालगत रक्ताच्या थारोळ्यात पडला अशी चर्चा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

युवकास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या युवकाचा मृत्यू झाला. युवकाची हत्या कोणी व कुठल्या कारणाने हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. पुढील तपास पंचवटी पोलीस (Panchavati Police) करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com