धारदार शस्त्राने भोसकून युवकाची हत्या

धारदार शस्त्राने भोसकून युवकाची हत्या

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

चार ते पांच जणांच्या टोळीने युवकाची निर्घृणपणे हत्या (Murder) केल्याची खळबळजनक घटना आज मध्यरात्री मनमाड रेल्वे स्थानकावर (Manmad Railway Station) घडली आहे...

शिवम पवार (Shivam Pawar) (रा.उसवड ता.चांदवड) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मनमाड रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी होती. त्यावेळी 4 ते 5 तरुणांनी शिवम याच्यावर तीक्ष्ण हत्याराने 5 ते 6 वार केले.

त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले आहे.

प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हत्येच्या वेई मुलगीदेखील त्या ठिकाणी होती. तिला पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com