
नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पाकिस्तानच्या (Pakistan) सिंझोरो गावात (Sinzoro Village) एका हिंदू महिलेची अत्यंत निर्घृणपणे हत्या (Murder) करून शिरच्छेद केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे...
याबाबत पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या हिंदू महिला खासदार कृष्णा कुमारी (MP Krishna Kumari) यांनी ट्वीट करत दिलेल्या माहितीनुसार, दया भील (४०) (Daya Bhel) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून तिचे डोकं धडावेगळं करण्यात आले आहे. तसेच या महिलेच्या चेहऱ्यावरची आणि शरीरावरची त्वचाही सोलून काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (Pakistan Peoples Party) जियाला अमर लाल भील यांनी असा दावा केला आहे की, या महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतला मृतदेह बुधवारी एका शेतात सापडला. पोलिसांनी (Police)तिच्या कुटुंबीयांचा शोध घेऊन त्यांच्याकडून अधिक माहिती घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले असून अधिक तपास पोलिसांकडून सुरु असल्याचे या नेत्याने सांगितले.