Friday, April 26, 2024
HomeजळगावVideo चौघं बहीण-भावंडांची हत्या : मुख्यमंत्र्यांनी घेतला घटनेचा आढावा

Video चौघं बहीण-भावंडांची हत्या : मुख्यमंत्र्यांनी घेतला घटनेचा आढावा

रावेर – Raver

बोरखेडा (ता.रावेर) येथील चौघां बहिण-भावंड हत्या प्रकरण आता वेगळे वळण घेत आहे. यातील १५ वर्षीय बालिकेवर अत्याचार होवून, अन्य तिघांचा खून झाल्याचा संशय बळावला असून, रावेर पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने ७ जणांना ताब्यात घेवून चौकशी सुरु केली आहे.

- Advertisement -

या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माहिती मागवली असून, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांच्या विविध शाखा सक्रीय झाल्या आहे.

शुक्रवारी, सकाळी बोरखेडा रोडवर मुस्तफा शेख यांच्या केळीच्या बागेत रस्त्यावरील घरात चार बहिण-भावंडाचे रक्ताच्या थेरोळ्यात मृतदेह पडून असल्याचे दृश्य शेतमालक मुस्तफा यांना दिसून आल्यावर या हत्याकांडाचा उलगडा झाला.

आई-वडील चूलत भावाकडे गढी ता.बिस्टांन जि.खरगोन येथे गेलेले असल्याने,घरी असलेल्या चार बहिण-भावंड यांचा मध्यरात्री धारदार कुऱ्हाडीने खून केल्याची घटना घडली.

सविता मेहताब रंधवे (भिलाला) वय-१५,राहुल मेहताब रंधवे-वय-११, अनिल मेहताब रंधवे, वय-८, नाणी मेहताब रंधवे यांचे मृतदेह सकाळी शेतमालक शेतात आल्यावर घराचा दरवाजा ठोठावून आवाज दिल्यावर प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दार ढकलून पहिले असता सर्व मृतदेह रक्ताच्या थेरोळ्यात आढळून आले.

याघटनेबाबत मुलीवर अत्याचार करून अन्य तिघांचा खून केल्याचा संशय असल्याने, पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी आता पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे, स्थानिक गुन्हे शाखेचे बापू रोहोम, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

श्वान पथक,ठसेतज्ञ पथक व फोरेन्सिक लॅब या पोलिसांच्या विविध शाखा देखील तपासात गुंतल्या आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या