Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेची हत्या

भांडण सोडविण्यास गेलेल्या महिलेची हत्या

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी ( Igatpuri ) शहरात एका महिलेची हत्या झाल्याने शहर पुन्हा या हत्येने हादरले आहे.हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे . गेल्या सात महिन्यातील ही तिसरी घटना असुन या महिलेची हत्या करून आरोपी फरार झाले आहे. जकीया शेख असे मृत महिलेचे नाव आहे.

- Advertisement -

या बाबत अधिक माहिती अशी की, गायकवाड नगर येथील आरोपी आणि त्याच्या आईत झालेला वाद मिटविण्यासाठी जकीया शेख गेल्या होत्या . मात्र हा वाद मिटवत असताना आरोपीने या महिलेचा धारदार शस्त्राने केला खून केला. या हत्येने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या सात महिन्यातील ही तिसरी खुनाची घटना असुन हत्या करून आरोपी फरार झाले आहे.

घटनास्थळी पोलीस उप अधिक्षक अर्जुन भोसले यांनी पाहणी केली असुन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या