फर्निचर उद्योजकाची हत्या : अखेर नाशिकरोडला खुनाचा गुन्हा दाखल

जाणून घ्या काय आहे प्रकरण?
फर्निचर उद्योजकाची हत्या : अखेर नाशिकरोडला खुनाचा गुन्हा दाखल

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

येथील फर्निचर व्यावसायिक व उद्योजक शिरीष सोनवणे (Shirish Sonawane) यांच्या हत्याप्रकरणी अखेर नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashikroad Police Station) खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

हा गुन्हा मालेगाव पोलिसांकडून नाशिक रोड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांचे भाऊ गजानन सोनवणे यांनी फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान संशयित आरोपीचे रेखाचित्र बनविण्याचे काम सुरू असून या रेखाचित्रानुसार संशयितांची ओळख पटण्याची शक्यता आहे.

तसेच सोनवणे यांच्या शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने शरीरात रक्तस्त्राव झाला व नाकात आणि तोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सुरुवातीला याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल होती.

त्यानंतर त्यांचा मृतदेह मालेगाव (Malegaon) येथे आढळल्याने त्या ठिकाणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा मालेगाव पोलिसांकडून (Malegaon Police) वर्ग करण्यात येऊन नाशिकरोड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.

शिरीष गुलाबराव सोनवणे यांचे अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी दुपारी साडे चारच्या सुमारास कारखान्यात असतांना एका स्विफ्ट कारच्या चालकासह तीन व्यक्तीपैकी एकाने कारखान्याचा कर्मचारी फिरोज लतिफ शेख यास मालक सोनवणे यांना ऑर्डर द्यायची आहे असे सांगून गाडी जवळ बोलविण्यास सांगितले.

पण फिरोज याने त्यांना नकार देत आपणच कारखान्यात या आणि काय ते बोला असे सांगितले. परंतु गाडीत बसलेल्या व्यक्तीने आपण अपंग असून चालता येत नाही असे सांगत सोनवणे यांना गाडीत बोलवा, असे सांगितल्यावर सोनवणे हे सदर गाडीत बसले.

दरम्यान फिरोज यास चहा आणण्यासाठी सांगण्यात आले, चहा देऊन फिरोज हा कारखान्यात गेला, पण बराच वेळ झाला तरी मालक आत आले नाही तसेच परंतु त्याने गाडी सिन्नरफाटाच्या दिशेने जातांना कामगारांनी पाहिली.

यानंतर सोनवणे यांचा पत्नी यांचा कारखान्यातील कामगारांस फोन आला व मालक सोनवणे यांचा फोन बंद येत असल्याचे सांगून विचारणा केली, यावेळी कामगारांनी बाहेर पाहिले असता मालक सोनवणे दिसून आले नाही यानंतर सर्वत्र खळबळ उडाली व नाशिकरोड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली होती.

फर्निचर उद्योजकाची हत्या : अखेर नाशिकरोडला खुनाचा गुन्हा दाखल
इलेक्ट्रिक बाइकच्या शोरूमला भीषण आग; ८ जणांचा होरपळून मृत्यू

यानंतर शनिवारी त्यांचा मृतदेह हा मालेगाव तालुक्यातील सायतरपाडे येथील कालव्यात सापडला यानंतर मालेगाव पोलिसांनी त्यांचे फोटो हे पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर टाकले यानंतर नाशिकरोड पोलिसांनी मृतदेहाची ओळख सोनवणे यांचा नातेवाईकांकडून पटविली असता हा मृतदेह त्यांचा असल्याचे समोर आले.

शवविच्छेदनानंतर त्यांच्या डोक्यास जबर मार लागला व शरीरात रक्तस्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात खून तसेच अपहरण पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आणि कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फर्निचर उद्योजकाची हत्या : अखेर नाशिकरोडला खुनाचा गुन्हा दाखल
...अन् सप्तशृंगी देवीचं दिसलं मूळ रूप, व्हिडीओ एकदा पाहाच

सोनवणे यांचा खून कोणी केला का केला की आर्थिक वादातून हा खून झाला याचा तपास करण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com