Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याडोक्यात दगड घालून नाशकात एकाची हत्या

डोक्यात दगड घालून नाशकात एकाची हत्या

नाशिक l प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरात डोक्यात दगड घालून एकाची क्रूरपणे हत्या केल्याची घटना आज नाशिकमध्ये घडली. पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे….

- Advertisement -

अनिल गायधनी असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होता. तीन महिन्यांपूर्वीच त्याने येथील एका हॉटेलमध्ये कामाला सुरुवात केली होती.

आज पहाटेच्या सुमारास रामसेतू पूल परिसरातील राजहंस दुकानाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला.

यानंतर नाशिक पोलिसांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरू केले।

दरम्यान, परिसरातील दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी शुभम मोरे नामक एक संशयितास ताब्यात घेतले आहे.

संशयित शुभम याच्या वडिलांचा भेळ भत्याचा व्यवसाय असल्याचे समजते. आपापसातील भांडणातून हा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे. अधिक तपास नाशिक पोलीस करत आहेत.

पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडल्याचे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना समजले. यानंतर काही वेळातच पोलीस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराचा ताबा घेऊन तपासकार्य सुरू केले. यानंतर काही वेळेतच संशयित ताब्यात घेण्यात आला. या कारवाई दरम्यान पोलीस उपायुक्त अमोल तांबे, सहायक पोलिस आयुक्त श्रीमती खन्ना यांच्यासह अनेक अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या