Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाची 'इतकी' वाहने 15 वर्ष जुनीच; 'स्क्रॅप' वाहने रस्त्यावर कशी?

मनपाची ‘इतकी’ वाहने 15 वर्ष जुनीच; ‘स्क्रॅप’ वाहने रस्त्यावर कशी?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी प्रदुषण (Pollution) टाळण्यासाठी तसेच होणाऱ्या अपघाताचे (accidents) प्रमाण कमी करण्यासाठी पंधरा वर्ष पूर्ण झालेल्या जुन्या गाड्या वापरण्यावर कायमचे निर्बंध येणार असल्याचे म्हटले होते.

- Advertisement -

दरम्यान या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास नाशिक महापालिकेतील (Nashik Municipal Corporation) 20 चार चाकी वाहने भंगारात (scrap) जाणार आहे. सध्या पालिकेत एकूण 225 विविध प्रकारची मोठी वाहने आहेत. महापालिकेत अधिकारी आणि पदाधिकाऱ्यासाठी असलेली वाहने तसेच वॉटर टॅंक, मालवाहतुकीसाठी छोट्या गाड्या, ट्रॅक्टर (tractor) अशी विविध प्रकारची वाहने आहेत.

दरम्यान गाडी मॅनिफॅक्चर होवून गाडीस पंधरा वर्ष पुर्ण झाल्यास ती गाडी रस्त्यावर धावणार नाही. जुन्या गाड्यांचे अपघात (accident) होण्याचे प्रमाण अधिक आहे किंवा या गाड्यामुळे अधिक प्रदुषण (Pollution) होते म्हणुन १५ वर्षापेक्षा अधिक गाड्या वापरण्यावर बंदी असा नवीन नियम लवकरचं लागू होणार असल्याचं गडकरींनी म्हटले होते. त्यामुळे पंधरावर्ष जुन्या गाड्या थेट भंगारात टाकाव्या लागणार आहे. नवा नियम सध्या तरी लागू झालेला नाही मात्र तो राज्य सरकारच्या (state govrenment) वाहनांसाठी लवकरच लागू होणार आहे.

भारत सरकार (Government of India) किंवा राज्य सरकारच्या उपक्रमांची वाहने १५ वर्षांनंतर भंगारात काढावी लागतील. कुठलीही सरकारी पंधरा वर्ष जुनी वाहन रस्त्यावरून धावणार नाहीत, असं गडकरींनी स्पष्ट केलं होता. भारत सरकारने हे धोरण सर्व राज्यांना पाठवले आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 15 वर्षे जुन्या बस, ट्रक, कार रद्द कराव्यात, अशा सुचना गडकरींनी दिल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या