Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यामनपाचे 'लक्ष्य' अतिक्रमण हटविण्यावर

मनपाचे ‘लक्ष्य’ अतिक्रमण हटविण्यावर

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहराला (nashik) सुंदर स्वच्छ करण्यासाठी महापालिकेने (Municipal Corporation) पुढाकार घेतला असून एकीकडे विकास कामे (Development works) सुरू असताना

- Advertisement -

दुसरीकडे आता अतिक्रमण (Encroachment) काढण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शहरातील उद्यानांबाहेर (garden) मोठ्या प्रमाणात अनधिकृतरीत्या खाद्यपदार्थ व इतर वस्तुंचे दुकाने थाटण्यात आली आहे.

त्यामुळे उद्यानांना बकाल स्वरुप प्राप्त झाले असून सौंदर्याला बाधा पोहचत आहे. अतिक्रमण विभागाची (Encroachment Department) मदत घेऊन ही दुकाने पाठविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका उद्यान अधीक्षक विजयकुमार मुंडे (Municipal Park Superintendent Vijayakumar Munde) यांनी दिली शहर व उपनगरातील उद्यानांबाहेर (garden) खाद्यपदार्थांचे गाडे (Food carts), खेळण्या व इतर दुकानांचे अतिक्रमण (Encroachment of shops) वाढले असून त्यामुळे उद्यान परिसराला बकाल स्वरुप प्राप्त झाले आहे.

उशीराने का होईना उद्यान विभागाचा (Department of Parks) रडारवर हे अतिक्रमण (Encroachment) आले आहे. हा बकालपणा दूर करण्यासाठी लवकरच उद्यानांबाहेर अतिक्रमण निर्मूलन मोहीम (Encroachment Eradication Campaign) राबवली जाणार आहे. देशात बंगळुरुनंतर उद्यानाचे शहर म्हणून नाशिकचा (nashik) नावलौकिक आहे. फाळके स्मारक (Phalke Memorial), बाॅटनिकल उद्यान (Botanical Garden), आयुर्वेदिक वनस्पतीचे तवली फाटा उद्यान यामुळे नाशिक शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे. शहर व उपनगरीय परिसरात जवळपास पाचशे छोटे मोठे उद्यान आहेत. मात्र, या उद्यानांच्या प्रवेशद्वार व आजुबाजूच्या परिसरात अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे.

उद्यानांबाहेर अवैधरित्या चौपाटी, खाद्यपदार्थाचे स्टाॅल, खेळण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली आहे. उद्यानाला भेट देणार्‍यांपेक्षा खवय्येच या ठिकाणी जादा गर्दी करतात. शिवाय खाद्य पदार्थांचा कचरा विक्रेत्यांकडून तेथेच टाकला जातो त्यामुळे दुर्गंधी सुटते. यामुळे उद्यान परिसराला बकालस्वरुप प्राप्त झाले आहे.

महापालिका उद्यान विभाग सुशोभिकरणावर दरवर्षी लाखो रुपये खर्च करतो. मात्र, अतिक्रमणामुळे उद्यानांचा सौंदर्याला बाधा पोहचत आहे. ते पाहता अतिक्रमण विभागाच्या मदतीने उद्यानांबाहेरील अवैधरित्या उभारले दुकाने हटविली जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या