उद्यापासून मनपाची ‘ढोल बजाओ’ वसुली मोहीम?

उद्यापासून मनपाची ‘ढोल बजाओ’ वसुली मोहीम?

नाशिक। प्रतिनिधी Nashik

एक लाखांच्या पुढे असलेले थकबाकीदार यांच्या घरासमोर किंवा आस्थापनांसमोर महापालिकेकडून ( NMC ) ढोल वाजविण्याच्या मोहिमेला ( Dhol Bajao' recovery campaign )दीपावली सणामुळे ब्रेक देण्यात आला होता. तर आता दिवाळी संपल्यामुळे येत्या सोमवारपासून पुन्हा ढोल बजाव वसुली मोहीम सुरू होणार असल्याचे समजते.

17 ऑक्टोबरपासून शहरातील सहीही विभागात एकाच वेळेला महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या आदेशानुसार ढोल बजाव मोहीम सुरू करण्यात आली होती.

पहिल्या तीन दिवसांंत सुमारे तीन कोटी रुपयांपर्यंत कर वसुली झाली होती. तिसर्‍या दिवशी नाशिक पश्चिम विभागात सर्वाधिक 27 लाख 28 हजार तर पंचवटी विभागात 14 लाख 18 हजार 745 रुपये वसुली झाली होती. दरम्यान दीपावली सणाच्या काळात महापालिकेने कडक वसुली मोहीम सुरू केल्यामुळे विविध राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली होती.

दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे मोहीम थांबविण्यात आली होती. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी 31 डिसेंबरपर्यंत सर्व वसुली पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com