मूर्ती संकलन केंद्रांवर मनपा उभारणार सेल्फी पॉइंट

नाशिक मनपा
नाशिक मनपा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची (Ganeshotsav) तयारी महापालिका प्रशासनाच्या (Municipal administration) वतीने जोमाने सुरू झाली आहे.

गणेशोत्सव काळात तसेच विसर्जनाच्या (ganesh visarjan) दिवशी करण्यात येणार्‍या विविध कामासंदर्भात आज महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची विशेष बैठक होऊन मुर्ती संकलन केंद्रांवर (Idol collection center) महापालिकेच्या वतीने यंदा सेल्फी पॉईंट (Selfie point) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी गणेशोत्सवाचे (ganeshotsav) नियोजन सुरू आहे. मनपा अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे (Municipal Additional Commissioner Suresh Khade) यांच्या उपस्थितीत मनपा मुख्यालय नियोजनासंदर्भात विशेष बैठक झाली.

यामध्ये गणेशोत्सवा संदर्भातील शासनाच्या गाईडलाईन्स, गणेश विसर्जनाचे कृत्रिम तलाव (Ganesh Immersion Artificial Lake), गणेश मुर्ती संकलन केंद्र (Ganesh Idol Collection Centre), दीड ,तीन ,पाच ,सात दिवसांच्या मुर्तींचे संकलन, मूर्ती संकलन करताना येणार्‍या विविध अडचणी आणि त्याच्या उपाययोजना यावर चर्चा झाली.

तसेच नदीपात्रात मूर्ती विसर्जनास मज्जाव करणे, मिरवणूक मार्गाची साफसफाई (Cleaning the procession route), विसर्जन स्थळी अँम्बुलन्स (Ambulance) आणि इतर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे, संकलित करण्यात आलेल्या मुर्तींचे तसेच निर्माल्याची वाहतूक करण्याकरीता वाहनाची उपलब्धता करणे, सार्वजनिक गणेश मंडळांचे निर्माल्य रोजच्या रोज उचलणे, मूर्ती संकलन केंद्रांवर सेल्फी पॉइंट तयार करण्याचे ठरविण्यात आले.

बैठकीत शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोडसह मनपाचे सर्व विभागीय अधिकारी, घनकचरा व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com