इलेक्ट्रिक बसेससाठी मनपा प्रस्ताव पाठवणार

इलेक्ट्रिक बसेससाठी मनपा प्रस्ताव पाठवणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेने शहर बस ( NMC Bus Services ) सुरू करून एक वर्ष पूर्ण झाले आहे. तरी 250 बस पैकी 207 बसेस सध्या रस्त्यांवर धावत आहे. काही सीएनजी तर काही डिझेल बसेसचा यात समावेश आहे. दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी शासनाने इलेक्ट्रिक वाहनांना ( Electrical Vehicals ) पसंती देण्याचे ठरविले आहे. याबाबत धोरण देखील निश्चित करण्यात आले आहे.

महापालिकेने यापूर्वी केंद्र सरकारकडे 50 इलेक्ट्रिक बसेस मिळावे, असे प्रस्ताव पाठवलेला आहे. त्यात प्रगती झालेली नाही. तर केंद्र सरकारने आता नव्याने क्लीन एअर ही योजना सुरू केली आहे. त्या अंतर्गत आगामी पाच वर्षासाठी नाशिक महापालिका एकूण सुमारे 100 इलेक्ट्रॉनिक बसेसची मागणी मनपा करणार आहे.

या नवीन धोरण नुसार राज्य शासनासह केंद्र सरकार मिळून एका बसला सुमारे 60 लाख रुपये पर्यंत अनुदान देणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली ) नाशिक महापालिकेत परिवहन समितीची विशेष बैठक झाली. यामध्ये चर्चा होऊन केंद्र सरकारकडे 100 इलेक्ट्रिक बसेससाठी प्रस्ताव पाठवण्याचे ठरल्याची माहिती मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या क्लिनर एअर योजनेअंतर्गत केंद्र सरकार दीड कोटी रुपये किंमत असलेल्या इलेक्ट्रिक बस साठी सुमारे 45 ते 50 लाख रुपये त्याचप्रमाणे गाडीच्या किमतीचे दहा टक्के किंवा पंधरा लाख रुपये जी रक्कम जास्त राहील ती रक्कम राज्य शासन देणार आहे. यामुळे सुमारे 60 लाख रुपये केंद्र तसेच राज्य शासनाच्या वतीने मिळणार आहे तर नाशिक महापालिका याबाबत निविदा प्रक्रिया करून ठेकेदाराशी चर्चा करून ठेकेदार गाडी घेणार तर मनपा दर निश्चित करून करार करणार आहे.

बसमध्ये टिव्ही दिसणार

मागील वर्षी नाशिक महापालिकेने शहर बससेवा सुरू केली होती. नागरिकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. सध्या 207 बसेस रस्त्यावर धावत असून साधारण 21 लाख रुपयांचे उत्पन्न दररोज मिळत आहे. तर सुमारे 93 हजार लोक रोज प्रवास करीत असले तरी नाशिक महापालिकेची बससेवा तोट्यात सापडली आहे. यामुळे पाच मार्गावरील बस रूट सध्या कमी करण्याचा विचार सुरू आहे. त्याचप्रमाणे उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी जाहिरातीचा आसरा घेण्यात येणार आहे. या अंतर्गत बसच्या बाहेरील बाजूला जाहिरातीचे फलक राहणार असून आत मध्ये टीव्ही लावून त्याच्यावर जाहिराती दाखवण्यात येणार आहे. यामुळे बसचा तोटा कमी होईल व प्रवाशांचे देखील मनोरंजन होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com