Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यास्मार्ट सिटीकडून मनपाला 'इतक्या' कोटींची प्रतीक्षा

स्मार्ट सिटीकडून मनपाला ‘इतक्या’ कोटींची प्रतीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये(Smart City ) केंद्रासह राज्यशासन तसेच नाशिक महापालिकेचा वाटा होता. नाशिक महापालिकेच्या 250 कोटीपैकी 200 कोटी रुपये स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आलेले आहे. मात्र कामाची गती पाहिल्यावर निधी खर्च झालेला नसल्यामुळे यापैकी शंभर कोटी रुपये नाशिक महापालिका परत मिळावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी यांनी केली होती. तर महासभेत देखील याबाबात चर्चा झाली होती.

- Advertisement -

तर रक्कम परत न मिळता त्यापोटी व्याजाची रक्कम महापालिकेला मिळणार, असे स्मार्ट सिटीने कबूल केले होते, मात्र अद्यापही व्याजापोटीचे सुमारे 33 कोटी रुपये महापालिकेला अदा करण्यात आलेले नाही. स्मार्ट सिटीची मुदत काही महिन्यानंतर संपत आल्यामुळे महापालिकेची चिंता वाढली असून महापालिकेच्या वित्त विभागाने स्मार्ट सिटीला पुन्हा पत्र देऊन याबाबत मागणी केली आहे.

सध्या नाशिक महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे मोठी विकास कामे हातात घेण्यात येत नाही. मात्र जी कामे सुरू आहे त्यांना पूर्ण करण्यासाठी व्याजाची रक्कम मिळाल्यास विकास कामे आणखी गतीने होणार आहे. वेळेत रक्कम मिळाली नाही तर नाशिक महापालिकेच्या विकासकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक महापालिकेचे पैसे स्मार्ट सिटीकडे पडून आहे. यामुळे शहरातील विकास कामांसाठी शंभर कोटी रुपये स्मार्ट सिटीने परत महापालिकेला द्यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून करण्यात आली होती. तर महापौर सतीश कुलकर्णी असतांना महासभेत याबाबतचा प्रस्ताव देखील पारित करण्यात आला होता.

मात्र स्मार्ट सिटीने फक्त व्याजापोटीची रक्कम देण्याचे कबूल केले होते. स्मार्ट सिटीचे अध्यक्ष तथा राज्याचे सचिव लिमये यांच्या अध्यक्षतेखाली नाशिकमध्ये झालेल्या आढावा बैठकीत नाशिक महापालिकेला व्याजापोटी सुमारे 33 कोटी रुपये देण्याचे ठरले होते. ती रक्कम 31 मार्च 22 पर्यंत महापालिकेला मिळणे अपेक्षित होते, मात्र 31मार्च 23 येत आहे तरी नाशिक महापालिकेला स्मार्ट सिटी कंपनीकडून व्याजापोटीची रक्कम मिळालेले नाही. यामुळे विकासकामांना अडथळा येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

स्मार्ट सिटीकडून दोनशे कोटी रुपयांच्या व्याजापोटी सुमारे 33 कोटी रुपये नाशिक महापालिकेला मिळणार आहे. याबाबत आमचा पत्रव्यवहार सुरू आहे. पैसे लवकर मिळावे, अशी आमची अपेक्षा आहे.

– नरेंद्र महाजन, मुख्य वित्त अधिकारी, मनपा नाशिक

- Advertisment -

ताज्या बातम्या