
नाशिक । प्रतिनिधी Nashik
महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत ( Social Welfare Department of the Municipal Corporation) दिव्यांगांसाठी वैयक्तिक लाभाच्या 11 कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी 30 डिसेंबरपर्यंत हयातीचा दाखल प्रत्यक्ष येऊन सादर करावा, असे आवाहन मनपाच्या समाज कल्याण विभागाचे प्रभारी उपायुक्त नितीन नेर यांनी केले आहे.
महापालिकेतर्फे दिव्यांगांसाठी सुरु करण्यात आलेल्या योजनांमधील योजना क्रमांक 3 प्रौढ बेरोजगार अर्थसहाय्य योजना व योजना क्रमांक 9 मतिमंद / मेंदूपीडित बहुविकलांग दिव्यांग व्यक्तींना अर्थसहाय्य योजना या योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्यात आलेले आहे. योजना क्रमांक 3 च्या अटी, शर्थीतील अट क्रमांक 5 व योजना क्रमांक 9 च्या अटी, शर्थीतील अट क्रमांक 4 च्या दुरुस्तीनुसार ज्या लाभार्थ्यांना योजना क्रमांक 3 आणि योजना क्रमांक 9 अंतर्गत अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले आहे, अशा लाभार्थ्यांनी दरवर्षी डिसेंबर महिन्यात हयातीचा दाखला, अर्ज आवश्यक त्या कागदपत्रकांसह महानगरपालिका मुख्यालयातील समाजकल्याण विभागात सादर करणे आवश्यक आहे.
या दोन्ही योजनेच्या लाभार्थ्यांनी त्यांचे अर्थसहाय्य नियमित चालू ठेवण्यासाठी महानगरपालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन (Rajiv Gandhi Bhavan )येथील समाजकल्याण विभागातून हयातीच्या दाखल्याचा अर्ज प्राप्त करून घ्यावा. हा अर्ज 30डिसेंबरपर्यंत समाजकल्याण विभागात समक्ष येऊन सादर करावा, तसेच ज्यांनी महानगरपालिकेच्या दिव्यांग योजनांचा अद्याप लाभ घेतलेला नाही, अशांनी ते पात्र ठरत असणार्या योजनेअंतर्गत आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा आणि योजनेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन मनपाच्या समाजकल्याण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.