हवाशुद्धीसाठी मनपाला कोटींचा निधी

हवाशुद्धीसाठी मनपाला कोटींचा निधी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

मोठ्या शहरांमधील हवेची गुणवत्ता (air quality) सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या (Central Govt) वतीने दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांना (Local Self-Government) निधी (fund) देण्यात येतो.

यंदा नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) 70 कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. महापालिका हद्दीतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे सर्वेक्षण नोंदविण्यात आले असल्यामुळे हा निधी देण्यात आला आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या (Central Pollution Control Corporation) सर्वेक्षणानुसार राज्यात मुंबई (mumbai), पुणेपाठोपाठ नाशिक (nashik) शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे. नाशिकच्या हवेची गुणवत्ता (air quality) ढासळल्यामुळे हवेच्या शुद्धतेसाठी महापालिकेच्या हद्दीत हवा गुणवत्ता नियंत्रणासाठी तीन केंद्रे उभारली जाणार आहेत.

शवदाहिन्यांवर तीन कोटी खर्च

एन-कॅप योजनेअंतर्गत (N-Cap Scheme) लाकडांमधून निघणारा धूर कमी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे हवा गुणवत्ता सुधारण्याचा भाग म्हणून लाकडावरील शवदहनाला पर्याय म्हणून विद्युत दाहिनी हा पर्याय पुढे आला आहे. दसक, पंचवटी व मोरवाडी येथील स्मशानभूमीमध्ये विद्युत शवदाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. यावर तीन कोटींची खर्च केला जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com