मनपा शाळा स्मार्ट करताय... पण शाळेत शिक्षकच नाही

मनपा शाळा स्मार्ट करताय... पण शाळेत शिक्षकच नाही

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

महापालिकेच्या शाळा स्मार्ट (Smart School) करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जात असताना दुसरीकडे शाळांना शिक्षकच (teachers) नसल्याचे विद्यार्थ्यांचे (students) नुकसान होत आहे.

असाच प्रकार असलेल्या शिवाजीनगरच्या शाळेत तातडीने शिक्षक नियुक्त न केल्यास विद्यार्थ्यांना (students) घेऊन राजीव गांधी भवनासमोर (Rajiv Gandhi Bhawan) आंदोलन (agitation) करण्यात येईल, असा इशारा दिनकर पाटील (Dinakar Patil) यांनी दिला. सातपूर (satpur) येथील शिवाजीनगर येथे महापालिकेने २५ कोटी रुपये खर्च करून शाळा (school) बांधली मात्र, शाळेत विज्ञान, इतिहास आणि भूगोलसारख्या विषयांना शिक्षकच नसल्याचे प्रकार उघड झाले आहे.

खुद्द शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनीच याबाबत तक्रारी केली असल्याने परिसराचे माजी नगरसेवक आणि माजी सभागृह नेते दिनकर पाटील (Former corporator and former house leader Dinkar Patil) यांनी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांना साकडे घातले आहे. यासंदर्भात पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतली आणि कैफीयत मांडली आहे. या शाळेत नऊ शिक्षकांची गरज असून पुरेसा शिक्षक नसल्याने मुलांचे नुकसान होत असल्याची तक्रार त्यांनी केली आहेत.

समवेत शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पत्रही आयुक्तांना दिले आहे. परीसरात कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची मुले या शाळेत शिकतात महापालिकेच्या अन्य वर्गाच्या तुलनेत शाळेत सकाळच्या सत्रात आठवी, नववी आणि दहावीत शिकणाया विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून, सर्व विषयांसाठी शिक्षकच नियुक्त नाही परिणामी सध्या केवळ मराठी आणि इंग्रजी हे विषयच शिकविले जात असल्याने मुलांचे नुकसान होत आहे.

इतर वर्गात पुरेसे शिक्षकच नाही. एक वर्षापासून आपण या समस्येचा सामना करीत आहोत, शिक्षक नियुक्त केले जात नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे शाळेत तातडीने शिक्षक नियुक्त न केल्यास विद्यार्थ्यांना घेऊन राजीव गांधी भवनासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिनकर पाटील यांनी दिला.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com