मनपा स्थायी समितीची आज सभा

मनपा स्थायी समितीची आज सभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाच्या Corona पहिल्या आणि दुसर्‍या लाटेतील बळींची संख्या आणि स्मशानभूमींमध्ये मृतांवर झालेल्या अंत्यसंस्काराच्या आकडेवारीत बरीच तफावत असताना आता करोनाच्या तिसर्‍या लाटेत बळींची संख्या वाढण्याचा धोका लक्षात घेता सर्व धर्मियांच्या अंत्यसंस्कार योजनेसाठी तीन कोटी रुपयांची वाढीव तरतूद करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेनंतरआज (दि.14) होणार्‍या स्थायी समितीच्या सभेत मान्यतेसाठी ठेवले आहे. आज सकाळी 11.30 वाजता स्थायी समितीची सभा Nashik Municipal Standing Committee meeting अध्यक्ष गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली होत असून या विषयावर बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून शहरात 2003 पासून मोफत अंत्यंस्कार योजना सुरू आहे. स्थायीचे तत्कालिन सभापती विजय साने यांच्या संकल्पनेतून ही योजना सुरू झाली. सुरूवातीला हिंदू धर्मिंयासाठी राबविण्यात येत असलेली ही योजना नंतरच्या काळात सर्वच धर्मियांकरीता लागू केली झाली.

यासाठी महापालिका ठेकेदाराला विशीष्ट रक्कम अदा करते. गत दीड-पावणेदोन वर्षात करोनामुळे मृत्यू दर वाढल्यामुळे मोफत अंत्यसंस्कारासाठी तरतूद केलेला निधी संपुष्टात आला आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापन विभागाने 14 ऑगस्ट रोजीच्या महासभेवर वाढीव मान्यता मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होेता.

त्यास महासभेने मान्यता दिली असली तरी नियमानुसार या वाढीव खर्चाच्या तरतुदीस स्थायी समितीची मान्यता घेतली जाणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनाने उद्याच्या स्थायी समितीच्या सभा पटलावर हा प्रस्ताव सादर केला आहे.

करोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेत झालेले मृत्यू तसेच अन्य आजारांमुळे झालेले मृत्यू यांची संख्या जवळपास वीस हजार आहे. आता तिसर्‍या लाटेत असाच मृत्यू दर कायम राहिला तर ऐनवेळी अंत्यसंस्कार रखडू नये, असे कारण देत तीन कोटी रुपयांच्या वाढीव रकमेची मान्यता मिळवली जात आहे.

Related Stories

No stories found.