मनपा नोकरभरतीला गती मिळणार?

मनपा नोकरभरतीला गती मिळणार?

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

महापालिकेत मागील 24 वर्षापासून नोकर भरती प्रक्रिया (Job Recruitment Process) झालेली नाही.

दुसरीकडे महापालिकेतून सेवानिवृत्त (Retired) होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर उपाय म्हणून तत्कालीन आयुक्त रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar) यांनी महापालिकेत नोकरभरती करण्याचा निर्णय घेतला होता, शासनाने देखील काही पदांना मंजुरी दिली होती.

या नंतर मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) देखील नव्याने डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार (Dr. Chandrakant Pulkundwar) हे आयुक्त तथा प्रशासक म्हणून आले. ते नोकर भरतीसाठी प्रयत्न करणार का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. नाशिक महानगरपालिकेत नोकर भरती (Recruitment of employees) व्हावी, यासाठी तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांनी विशेष महासभा घेऊन प्रस्ताव मंजूर करून तो शासनाकडे पाठवलेला आहे.

त्यात सत्ताधार्‍यांबरोबरच विरोधकांनी सुद्धा भरती प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्न होण्याची मागणी करून महापालिकेत भरती करण्याचा ठराव मंजूर केला होता. यावेळी महापालिकेचा आस्थापना खर्च हा 35 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे शासनाकडून भरती प्रक्रियेला मंजुरी (Approval of recruitment process) मिळत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.

मार्च महिन्यापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू झाल्यामुळे महापालिकेच्या सदस्यांच्या कार्यालय, त्या ठिकाणचा कर्मचारी वर्ग, वाहनाचा खर्च अशा अनेक खर्चांना ब्रेक लागला असल्यामुळे महापालिकेचा हा आस्थापना खर्च 35% च्या आत आला आहे. याच विषयाला अनुसरून तत्कालीन आयुक्त रमेश पवार (Commissioner Ramesh Pawar) यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन महापालिकेच्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला असल्याचे त्यांनी सांगितले होते.

ही भरती प्रक्रिया नामांकित अशा कंपन्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे महानगरपालिकेत भरती होण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाल्याचा दावा केला जात होता. यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यामुळे आयुक्त पवार यांची बदली झाली. या बदलीबरोबरच हा विषय सुद्धा बाजूला पडला असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, राज्यातील शिंदे फडणवीस सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देऊन हा प्रश्न मार्गी लावतील असा दावा भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com