एकता दौड निमित्त धावले मनपा अधिकारी

एकता दौड निमित्त धावले मनपा अधिकारी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शासनाच्या आदेशानुसार नाशिक महापालिकेतर्फे (Nashik Municipal Corporation) सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची जयंती (Jayanti) राष्ट्रीय एकता दिवस (National Unity Day) निमित्ताने एकता दौडचे (unity run) आयोजन करण्यात आले. यामध्ये महापालिका आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी तसेच महापालिकेतील सेवकांनी सहभाग घेतला होता.

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर (Martyr Anant Kanhere Ground) (गोल्फ क्लब मैदान) (Golf Club Ground) सकाळी आठ वाजता क्लॉक टॉवर येथे सर्व विभागाचे अधिकारी व सेवक एकत्रित जमले होते. तेथून एकता दौडला सुरुवात झाली. एमराल्ड पार्क सिग्नल मार्गाने पुढे महापालिकेच्या जलतरण तलावाच्या ठिकाणी दौडचा समारोप झाला. यावेळी राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त (National Unity Day) शपथ घेण्यात आली.

तीन किलोमीटरच्या या दौडमध्ये मनपाचे सुमारे 250 अधिकारी, सेवकांनी भाग घेतला होता. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (Municipal Commissioner and Administrator Dr. Chandrakant Pulkundwar) यांच्यासह अतिरीक्त आयुक्त (शहर) अर्चना तांबे, उपायुक्त डॉ. दिलीप मेनकर, करुणा डहाळे, विजयकुमार मुंढे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, अधिक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, उदय धर्माधिकारी, शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी सुनीता धनगर, घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. आवेश पलोड, माहिती तंत्रज्ञान विभाग संचालक नरेंद्र धामणे,

मुख्य लेखा व वित्त अधिकारी नरेंद्र महाजन, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक हर्षल बाविस्कर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत शेटे, डॉ. कल्पना कुटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, नगर सचिव राजू कुटे, विभागीय अधिकारी मयूर पाटील, मदन हरीश्चंद्र, नितीन नेर, कैलास राबडिया, सुनील आव्हाड, जनसंपर्क अधिकारी गिरीश निकम उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com