कापडी पिशवी एटीएमसाठी मनपाचा पुढाकार

कापडी पिशवी एटीएमसाठी मनपाचा पुढाकार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नदीचे प्रदूषण ( River Pollution ) टाळण्यासाठी प्लास्टिक बंदची ( Plastic Ban ) कठोर अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र, त्यासाठी पर्यायी कागदी आणि कापड़ी पिशव्या देखील तयार होणे आवश्यक आहे. त्यामुळे आता मध्यंतरी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याप्रमाणे दक्षिण भारतातील कापडी पिशव्यांचे एटीएम नाशिकला बसवण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेऊन पाहणी करावी, अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Divisional Commissioner Radhakrishna Game) यांनी केली आहे. मध्यंतरी झालेल्या गोदावरी नदी प्रदूषणमुक्तीच्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली होती.

नाशिक शहरातील प्लास्टिक बंदीबाबत याचिकाकर्ते निशीकांत पगारे यांनी या बैठकीत प्रशासनाला प्रश्न विचारले होते. अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकमध्ये प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी नागरिकांमध्ये अद्याप यासंदर्भात पुरेशी जागृती नाही, असे महापालिकेचे म्हणणे होते. तर प्रदूषण मंडळाच्या वतीने देखील प्लास्टिक बंदीबाबत माहिती देण्यात आली.

त्यानुसार काही कंपन्यांना सामाजिक दायित्व निधीतून कापडी पिशव्या हयार करण्याचे आवाहन केले त्यानुसार दोन कंपन्यांनी पाच हजार कापडी पिशव्या तयार करून दिल्या असल्या तरी नागरिकांत जागृती करताना प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांना मुबलक पर्याय मिळणे आवश्यक आहे, असे सांगीतले. त्यावर विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या मशीनची तपासणी करण्यासाठी सूचना केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com