Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामिशन नाशिक मनपा : एमआयएमचा महिला सक्षमीकरणावर भर

मिशन नाशिक मनपा : एमआयएमचा महिला सक्षमीकरणावर भर

नाशिक । फारूक पठाण Nashik

नाशिक महापालिकेतील सत्ताधारी (NMC Ruler Party) भारतीय जनता पक्षाला (BJP ) सत्ता बाहेर करण्यासाठी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन अर्थात एमआयएम ( MIM )पक्षाने पूर्ण तयारी केली आहे. सेक्युलर मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी आम्ही निवडक ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार आहेत.

- Advertisement -

सुमारे 25 जागांवर पक्षाचे अधिकृत उभे राहणार आहे, तर त्याच्यात पन्नास टक्के किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षित व उच्चशिक्षित मुस्लीम, दलित व इतर समाजाच्या उमेदवारांना आम्ही तिकिटे देणार आहे. अशी माहिती नाशिक महिला आघाडीच्या प्रभारी राहत फारूकी (काझी) Rahat Farooqi in charge of Nashik Women’s Front – MIM यांनी दिली.

आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशदूतच्या वतीने विविध पक्षांच्या महिला शहर अध्यक्षांच्या मुलाखती सुरू आहे. या संदर्भात आज एमआयएमच्या महिला प्रभारी शहराध्यक्ष फारुकी यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सांगितले की मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन मध्ये महिलांना आदराचे व सन्मानाचे स्थान आहे.

देशात सर्व ठिकाणी महिला पदाधिकारी असून पूर्ण शक्तिनिशी देशहितासाठी आम्ही घराबाहेर जाऊन पक्ष संघटनेचे काम करीत आहोत. यामध्ये पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी देखील असतात व कायम आम्हाला त्यांची मदत असते. महिलांना मुख्य प्रवाहात आणून पुरुषांच्या खांदा लावून देशाहितासाठी काम करण्यासाठी सतत प्रोत्साहित करत असतो. त्याचा फायदा देखील दिसत आहे.

पक्षाच्या वतीने महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात येत असतो, महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे, शिक्षित व्हावे, यासाठी पक्षाच्या वतीने उपक्रम देखील सुरु असतात. आगामी महापालिका निवडणुकीत देखील आम्ही यंदा चांगली कामगिरी करणार आहोत. मागील सुमारे दोन वर्षापासून पक्षाचे संघटन बांधण्यासाठी पक्षाचे नाशिक मधील तसेच महाराष्ट्र प्रदेशचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात प्रयत्न आहे.

शहराध्यक्ष म्हणून अहमद काजी यांची नेमणूक झाल्यापासून एम आय एम पक्षाने नाशिक शहरात एक चांगले काम उभे केले आहे. सध्या आमचे लक्ष मनपा निवडणूक आहे. हळूहळू पक्ष संघटन वाढत असून आगामी काळात एक चांगली संघटन नाशिकमध्ये उभी राहणार आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष कब5. बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी देखील नाशिकला येणार आहे. नाशिक मधील सध्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी व नाशिकमध्ये सत्ता परिवर्तन करण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरण्यासाठी एमआयएम सज्ज झाले आहोत, असा दावा देखील फारुकी यांनी केला आहे. महिलांचा टक्का राजकारणात वाढावा यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असतो.

महिलांचा सर्वांगीण विकास झाल्यास एक चांगला समाज तयार होतो तसेच देश सक्षम होतो, म्हणून आम्ही महिला सक्षमीकरणावर विशेष भर देण्याचा प्रयत्न करीत आहोत. नाशिक महापालिकेत आम्ही सत्तेत आलो किंवा सत्तेच्या भागीदारीत आलो तर महिलांच्या उद्धारासाठी भरपूर कामे करण्याचा आमचा मानस आहे. महिला सुरक्षा हा प्रमुख मुद्दा राहणार आहे.

त्याप्रमाणे आरोग्य, रोजगार, शिक्षा याकडे देखील विशेष लक्ष देणार. त्याप्रमाणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत मिळावा, यासाठी प्रयत्न करून गरीब विद्यार्थी आर्थिक कारणामुळे आपले शिक्षण पूर्ण करू शकत नाही, अशांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पक्षाच्यावतीने पुढाकार घेण्यात येईल. विशेष कार्यशाळा आयोजित करून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

पक्षाच्यावतीने ज्येष्ठ तसेच युवक-युवतींना अधिक संधी देण्यात येणार आहे. ज्येष्ठांचा अनुभव तसेच युवकांच्या जोश त्याचा समतोल राखून महापालिका निवडणुकीत आम्ही उतरणार आहोत, असेही फारुकी यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या