Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा निवडणुकीला नववर्षाचा मुहूर्त?

मनपा निवडणुकीला नववर्षाचा मुहूर्त?

नाशिक । फारूक पठाण Nashik

13 मार्च 2022 रोजी नाशिक महापालिकेतील महापौरांसह सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ संपला तर नाशिक महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदा प्रशासक राजवट सुरू झाली. अगोदरच करोना यानंतर ओबीसी आरक्षणामुळे ( OBC Reservation )रखडलेली नाशिक महापालिका निवडणूक ( NMC Elections )पुन्हा लांबण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisement -

राज्यातील सत्ता बदल झाल्यानंतर नव्याने प्रभागरचना होण्याचे संकेत मिळत असल्यामुळे तसेच मविआ सरकारने वाढवलेली सदस्य संख्या रद्द करण्याच्या निर्णय झाल्यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीका आता 2023 या नवीन वर्षातच मुहुर्त मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार असतांना नाशिक महापालिका निवडणुकीसाठी अकरा सदस्यांची वाढ करून तीन सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र राज्यात शिंदे व फडणवीस सरकारने आल्यानंतर तीनची प्रभागरचना रद्द करत जुनीच रचना कायम राहील, असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमध्ये प्रचंड गोंधळाची परिस्थिती पहायला मिळत असून सर्वत्र संभ्रमवस्था दिसून येत आहे.

महाविकास आघाडीने सत्तेत असताना नगरसेवकांची संख्या वाढवत आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीनची प्रभागरचना जाहीर केली होती. त्यानुसार नाशिक महापालिकेत नगरसेवक संख्या 122 वरुन 133 पर्यंत पोहचली.

मनपाचे तीन सदस्य संख्येनुसार एकूण 44 प्रभागाची रचना केली. मात्र, महाविकास आघाडी पायउतार होताच सत्तेत आलेल्या भाजप – शिंदे गट सरकारने नवीन प्रभाग रचना रद्द केली. त्यामुळे राजकीय पक्षांसह इच्छूक बुचकळ्यात पडले आहेत.

2017 महापालिका पंचवार्षिकनुसार प्रभागरचना कायम ठेवत निवडणूका घ्यायचा की नव्याने फेररचना करायची, या बाबत प्रचंड संभ्रवस्था पहायला मिळत आहे. राज्यशासनाकडून याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी होतील, ही अपेक्षा होती. मात्र, नवीन कोणत्याही सूचना याबाबत प्राप्त झाल्या नाही.

रचना कोणती; स्पष्ट आदेश नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत वाढविण्यात आलेले नगरसेवक संख्या रद्द करण्याच्या निर्णय घेण्यात आला तर 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणे निवडणूक घेण्याच्या सूचना देखील करण्यात आले. यामुळे नाशिक महापालिकेत 2017 साली चार सदस्य प्रभाग पद्धतीने एकूण 122 नगरसेवक निवडून आले होते, मात्र यामध्ये नगरसेवक संख्या कमी होणार, असे स्पष्ट उल्लेख बैठकीच्या मिनिट्समध्ये असले तरी प्रभाग किती सदस्यांचा ठेवायचचा याबाबत कोणत्याही प्रकारे स्पष्ट आदेश नसल्याने प्रशासनाची देखील डोकेदुखी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

2017 सालीचे प्रमाणे चार सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचे ठरले तर फक्त मतदान यादी नव्याने करून आरक्षण नव्याने करावे लागणार आहे. आणि जर तीन सदस्य प्रभाग रचनेप्रमाणे 122 सदस्य संख्या ठेवून रचना करण्याचे आदेश आले तर संपूर्ण प्रक्रिया नव्याने करावी लागणार आहे. यासाठी किमान सहा ते सात महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. यामुळे नाशिक महापालिकेला नवीन वर्षात म्हणजेच 2023 च्या जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये निवडणूक घेणे शक्य असल्याचे देखील बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या